शरद पवारांना कोरोनाची लस टोचली?; डॉक्टरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

शरद पवार यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत आपण लस टोचून घेतल्याचं सांगितलं. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारी ही लस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

शरद पवारांना कोरोनाची लस टोचली?; डॉक्टरांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाची लस टोचून घेतल्याची जोरदार अफवा पसरली आहे. त्यावर डॉक्टर श्रीकांत राजे यांनी खुलासा केला आहे. पवारांनी कोरोनावरची लस टोचून घेतली नसून रोग प्रतिकारकशक्ती वाढवणारी लस टोचून घेतल्याचं श्रीकांत राजे यांनी म्हटलं आहे. (sharad pawar did not get corona vaccine)

शरद पवार यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत आपण लस टोचून घेतल्याचं सांगितलं. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारी ही लस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, पवारांनी कोरोनाचीच लस टोचून घेतल्याची अफवा संपूर्ण राज्यात पसरली. वयाच्या ८०व्या वर्षीही पवारांनी कोरोनाचं संकट असूनही राज्यभर झंझावाती दौरे केले होते. त्यामुळे या अफवेला अधिकच बळ मिळालं होतं. त्यामुळे डॉ. श्रीकांत राजे यांना त्यावर खुलासा करावा लागला आहे. पवारांनी आरबीसीजी (RBCG) लस टोचून घेतली आहे. ही लस रोग प्रतिकारकशक्ती वाढवते आणि इम्युनिटी पॉवर वाढवते. त्यामुळे पवारांनी ही लस टोचून घेतल्याचं राजे यांनी सांगितलं.

पवार नक्की काय म्हणाले होते?

”मी कोरोनावरील लस घेतली असे लोक म्हणत आहेत, परंतु ते खरं नाही, त्यांच्याकडे (सीरम इन्स्टिट्यूट) आत्ता रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी (आरबीसीजी ट्रिपल बुस्टर) लस आहे. ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील ही लस घेतली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल,” असं पवारांनी सांगितलं होतं.

काय आहे आरबीसीजी लस

आरबीसीजी लस ही भारतासह आशिया खंडात लहान मुलांना दिली जाते. क्षयरोगापासून वाचण्यासाठी ही लस लहान मुलांना दिली जाते. तर, आरबीसीजी ट्रिपल बुस्टर ही लस 65 वर्षांवरील व्यक्तिंना दिली जाते. पण या लसीला आयसीएमआर ( ICMR) आणि जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नाही. परंतु, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही लस घेतली जाते. (sharad pawar did not get corona vaccine)

संबंधित बातम्या:

मी आणि माझ्या स्टाफने आज लस घेतली, सीरम इन्स्टिट्यूटच्या भेटीनंतर शरद पवारांची माहिती

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

देशात अराजक माजलंय; सरकारने चूक कबूल करावी; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

(sharad pawar did not get corona vaccine)

Published On - 7:17 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI