LIVE | नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांचा उद्यापासून पाहणी दौरा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मराठवाड्याकडे बारामतीवरुन रवाना

LIVE | नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांचा उद्यापासून पाहणी दौरा
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 11:57 AM

[svt-event title=”शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार” date=”18/10/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ] अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची माहिती शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहेत. तशी माहिती खुद्द पवार यांनी सास्तुर दौऱ्यावर असताना दिली. एकटे राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करु शकत नाही. त्यामुळं केंद्रानेही मदत द्यावी, अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचं यावेळी पवारांनी सांगितलं. पवार राज्यातील खासदारांसोबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार सास्तुरमध्ये दाखल” date=”18/10/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ] लोहाऱ्यात शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार सास्तुरमध्ये दाखल झाले आहेत. इथं झालेल्या नुकसानाची पाहणी करुन पवार सविस्तर माहिती घेतील. तसंच स्थानिक शेतकऱ्यांशीही ते संवाद साधणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सास्तूरकडे जाताना पवार लोहाऱ्यात थांबले” date=”18/10/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार सास्तूरकडे निघाले होते. त्यावेळी लोहारा इथल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. गाडीच्या खाली उतरुन पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी सरकारनं आपल्याला तातडीनं मदत करावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी पवारांकडे केली. पवारांच्या या दौऱ्याकडे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आशेनं पाहत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी पवार काक्रंबावाडीत” date=”18/10/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शरद पवार तुळजापुरातील काक्रंबा इथं दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन झालेल्या नुकसानाबाबत पवार माहिती करुन घेत आहेत. काही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर पवारांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. झालेल्या नुकसानाचीही पाहणी केली. त्यानंतर पवार पुढील दौऱ्यासाठी सास्तूरकडे रवाना झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार तुळजापूरमध्ये पोहोचले” date=”18/10/2020,9:27AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नुकतेच ते तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पवार आज तुळजापूरमध्ये पोहोचले आहेत.  [/svt-event]

बारामती: परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टीमुळं पिकांचं आतोनात नुकसान झालं. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मराठवाड्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच शरद पवार आपल्या बारामतीच्या गोविंद बाग या निवासस्थानावरुन हेलिकॉप्टरने तुळजापूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. पवार आज आणि उद्या मराठवाड्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा आणि उस्मानाबादमधील भागांना भेट देत, झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. ( Sharad Pawar on Marathwada inspection tour)

गेल्या आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्यांत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी काढून ठेवलेलं सोयाबीन डोळ्यादेखत वाहून गेलं. तर काही ठिकाणी सोयाबीनला बुरशी लागली, मोड फुटू लागले आहेत. पांढरं सोनं म्हणवणाऱ्या कापसाचंही मोठं नुकसान झालं आहे. शेकडो एकरवरील उभा ऊस आडवा झाला आहे. त्यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालाय. खरिपाच्या पिकांवर पाहिलेली स्वप्न मातीमोल झालेली या शेतकऱ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली. त्यामुळं सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार न पार पाडता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

परतीच्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर राज्य सरकारकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. वेळ पडल्यास सरकार कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे आता शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही ठोस पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे, असे प्रशांत बंब यांनी पत्रात म्हटले होते.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार

इतका मोठा पाऊस कधीच पाहिला नाही, केंद्रानं पथक पाठवावं; अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Sharad Pawar Marathwada inspection tour

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.