लॉकडाऊन आणि कोरोनाचं संकट, डॉ. आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Sharad pawar on Dr. Babasaheb Ambedkar jayanti) साजरी करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

लॉकडाऊन आणि कोरोनाचं संकट, डॉ. आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 12:30 PM

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Sharad pawar on Dr. Babasaheb Ambedkar jayanti) साजरी करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. देशात सध्या कोरोना फोफावत चालला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. सर्वांनी हा लॉकडाऊन पाळण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे (Sharad pawar on Dr. Babasaheb Ambedkar jayanti).

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

देशाच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या बाहेरदेखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषात आपण साजरी करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आपण जवळपास महिना ते दीड महिना साजरा करत असतो. मात्र, आता यावेळेला हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का? याचा गांभिर्याने विचार करायची गरज आहे. आपण अनेकदा आंबेडकर जयंतीसारखा सोहळा हा तीन ते चार आठवडे साजरा करत असतो. यावेळेला थोडंस या कार्यक्रमाला पुढे नेणं शक्य आहे का? याचा विचार निश्चितपणे करायची वेळ आली आहे.

आपण सामूहिकपणे एकत्र आलो तर त्यामुळे नवीन समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवू शकतो. याचा परिणाम समाजाच्या सर्व घटकांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेबांचे स्मरण करुया. त्यांचे योगदानाचे आठवण करुया.

दिल्लीचा मरकजचा सोहळा टाळायला हवा होता. पण तो टाळला गेला नाही. त्याचे परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांनी दिल्लीवरुन प्रवास केल्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील लोकांचे सणवार असतात. पण आजची स्थिती पाहूण पथ्य ही पाळलीच गेली पाहिजेत.

लॉकडाऊन सर्वांनी पाळायला हवा. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करु. एका चुकीची किंमत सर्वांना चुकवावी लागते. त्यामुळे पोलिसांना भूमिका घ्यावी लागते.

एकत्र राहू नका हेच माझं आग्रहाचं सांगणं आहे. ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचं पालन करा. पोलिसांवर हल्ले होत आहेत. हे योग्य नाही.

कोरोनाविरोधातील या लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे चांगलं लक्ष घालत आहेत. पोलीसही अतिशय चांगलं काम करत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत शेतकरी, छोटे उद्योजक सगळे अडचणीत आहेत. मात्र, आणखी दोन आठवडे काळजी घेऊया. हळूहळू सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल.

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्य बोलावणं हा अगदी शेवटचा पर्याय आहे.

सध्या सुट्टी आहे. या सुट्टीचा घरातल्या घरात चांगला आस्वाद घ्या. उत्तम आरोग्य कसे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करा. मराठीत खूप उत्तम साहित्य आहे. ते तुम्ही वाचू शकता. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य वाचा.

जीवनाश्यक गोष्टींची लोकांना गरज आहे ही गोष्ट खरी आहे. पण या राज्यात भाजीपाला, किराणा याची कमतरता नाही. राज्य सरकारने किराणा दुकान सुरु ठेवायला संमती दिली आहे.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी अनेक सुचना दिल्या आहेत. राज्यातील 90 टक्के लोक सुचनांची अंमलबजावणी करत आहेत.  पण अजूनही 10 टक्के लोक रस्त्यावर दिसतात.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा 341 वर, कुठे किती रुग्ण सापडले?

रेल्वे ट्रॅकवरुन पायपीट, चालून थकल्यावर तिथेच मुक्काम, चूल मांडून स्वयंपाक, मुंबई ते कोकण चाकरमान्यांची पायपीट

Non Stop LIVE Update
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.