PHOTO : शिर्डी साई मंदिरात अलोट गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा
शिर्डीत ठिकठिकाणी सर्व नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. (Shirdi Sai temple social distancing rules break)

- दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नियम अटींसह राज्यातील मंदिरे सुरु करण्यात आली. यानंतर पहिल्याच रविवारी शिर्डी साई मंदिर आणि परिसरात अलोट गर्दी पाहायला मिळाली.
- धार्मिकस्थळे सुरु करताना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र शिर्डीत ठिकठिकाणी सर्व नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
- आज रविवार असल्याने शिर्डीत हजारो भाविकांनी गर्दी केली. अनेक भाविक विना-मास्क रांगेत उभे असल्याचे दिसत आहे.
- विशेष म्हणजे मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
- भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन शिर्डी साई संस्थानकडून करण्यात येत आहे. ऑनलाइन पास घेऊन दर्शन बुक करा, असेही आवाहन करण्यात येत आहे.
- दररोज फक्त 6 ते 8 हजार भाविकांना दर्शन देण्याची सुविधा शिर्डी साई संस्थानाकडून करण्यात आली आहे. मात्र, तरीही सध्या दररोज 9 ते 10 हजार भाविक दर्शन घेत आहेत.
- मात्र भाविक ऑनलाईन बुकींग न करता ऑफलाईन पास घेत असल्याने दर्शन व्यवस्था कोलमडली आहे.
- साई संस्थानकडून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- आरतीच्या अगोदर मंदिर साफसफाईच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. जास्त सफाई कर्मचारी लावून वेळेची बचत करण्याचा प्रयत्न आहे.













