Shirdi Corona | भाजी विक्रेत्या महिलेला कोरोना, संपूर्ण गाव होम क्वारंटाईन

ही महिला भाजी विक्रेती असल्याने संपूर्ण गावाला होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर, गावातील परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

Shirdi Corona | भाजी विक्रेत्या महिलेला कोरोना, संपूर्ण गाव होम क्वारंटाईन
Follow us
| Updated on: May 28, 2020 | 4:39 PM

अहमदनगर : शिर्डी जवळील निमगाव कोर्‍हाळे येथील (Shirdi Vegetable Seller Woman) एक भाजी विक्रेत्या 55 वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याने राहाता तालुक्यात खळबळ उडाली. ही महिला भाजी विक्रेती असल्याने संपूर्ण गावाला होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर, गावातील परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला (Shirdi Vegetable Seller Woman) आहे.

राहाता बाजार समितीत होलसेल भाजीपाला खरेदीसाठी ही महिला जात असल्याने सात दिवसांसाठी बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या 29 जणांना कोरोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर महिलेवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

निमगाव कोर्‍हाळे येथील भाजी विक्रेत्या महिलेस गेल्या दोन तीन दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे तिला तपासणीसाठी 19 मे रोजी सावळीविहिर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी दाखल करण्यात आले (Shirdi Vegetable Seller Woman). त्यानंतर साई संस्थानच्या रुग्णालयातही तिची तपासणी करण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी तपासणीत कोरोना संशयित असल्याचे आढळून आल्याने त्या महिलेला नगर येथे पाठवण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात महिलेची तपासणी करण्यात आल्यानंतर घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याने शिर्डी परिसरात खळबळ उडाली असुन प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे (Shirdi Vegetable Seller Woman).

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा, मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा दावा

कोरोनाबाधित एका रुग्णाने हजारोंची चिंता वाढवली, बीडमध्ये 12 गावं कडकडीत बंद!

Lockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.