Lockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (IT company Pune) आहे.

Lockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (IT company Pune) आहे. देशात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊन आहे. या दरम्यान सर्व खासगी कंपन्या बंद आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी पगार आणि कामगार कपात केली आहे. पुण्यातही आयटी कर्मचाऱ्यांवर पगार आणि कामगार कपातीची टांगती तलवार आहे. यामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांमधील 68 हजार कर्माचारी चिंतेत (IT company Pune) आहेत.

शासनाने कर्मचाऱ्यांची कपात न करण्याचे आदेश दिले असतानाही कंपन्यांची मनमानी सुरु आहे. याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे 68 हजार आयटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे, पगार कपातीच्या नोटीस पाठवल्या जात आहेत. याबाबतच्या तक्रारी कर्मचारी करत आहेत. कंपन्या कामगार आयुक्तांच्या नोटिसीकडे दुर्लक्ष करत आहेत. आयटी, बीपीओ ,केपीओ या संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही ही समस्या भेडसावत आहे.

सध्या काही कंपन्यांमध्ये बेकायदेशीररित्या कर्मचारी कमी करणे, वेतन कमी करणे, सक्तीने राजीनामा देण्यास भाग पाडणे, अशा प्रकराच्या घटना घडत आहेत. या प्रकरणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

लॉकडाऊनमुळे देशालाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे, कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आल्या आहेत. तसेच राज्यातील 6 लाखांहून अधिक आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरी आणि वेतन धोक्यात येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Corona Effect | देशातील आर्थिक विकास दर शून्याखाली जाण्याचा अंदाज, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

Lockdown Special Report | लॉकडाऊन इफेक्ट, 40 दिवसात देशात 12 कोटी नोकऱ्या गेल्या

ऑनलाईन ऑर्डरमध्ये वाढ, लॉकडाऊनदरम्यान अमेझॉनकडून 75 हजार नोकऱ्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *