राज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित

राज्यात तीन पक्षाचं आघाडी सरकार असल्याचं सर्वज्ञात असलं तरी शिवसेना नेते संजय राऊत यांना मात्र राज्यात शिवसेनेचं सरकार स्वबळावर असल्याचं वाटत आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी चक्क पत्रकारांनाच शिवसेनेचं सरकार स्वबळावर कसं? याचं गणितचं समजावून सांगितलं आहे.

राज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित

पुणे: राज्यात तीन पक्षाचं आघाडी सरकार असल्याचं सर्वज्ञात असलं तरी शिवसेना नेते संजय राऊत यांना मात्र राज्यात शिवसेनेचं सरकार स्वबळावर असल्याचं वाटत आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी चक्क पत्रकारांनाच शिवसेनेचं सरकार स्वबळावर कसं? याचं गणितचं समजावून सांगितलं आहे. (shivsena leader sanjay raut reaction on sharad pawar statement)

पुण्यात श्रमिक पत्रकार संघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी त्यांना शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यावर काय वाटतं असं पत्रकारांनी राऊत यांना विचारलं. सुरुवातीला राऊत यांनी पवारांच्या प्रत्येक वक्तव्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नाही, असं सांगितलं. नंतर मात्र, सारवासारव केली. राज्यात भगवा फडकलेलाच आहे ना. हे स्वबळच आहे. आमचे 56 आमदार आहेत आणि राज्याला आम्ही मुख्यमंत्रीही दिला आहे. त्यामुळे मी म्हणतो हे स्वबळच आहे. त्यामुळेच सर्वजण एकत्रं आले ना, असं राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे पत्रकारही क्षणभर अचंबित झाले.

राज्यातलं ठाकरे सरकार पडणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. हे सरकार पडेल असं दिल्लीतले लोकही सांगत नाहीत. राज्यातले लोक पूर्वी सांगत होते. आता त्यांनी बोलायचं बंद केलं आहे. त्यामुळे आता राज्यातलं सरकार पुढील चार वर्षेही पूर्ण करेल याचा आम्हाला विश्वास आहे, असंही राऊत म्हणाले.

यावेळी शरद पवार की अमित शाह, यांच्यापैकी अधिक भीती कुणाची?, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर राऊत यांनी त्यांच्या बेधडक अंदाजात उत्तर दिलं. भीती कशाला हवी कोणाची…? शरद पवार किंवा अमित शाह भीतीदायक आहेत, असं मला वाटतं नाही … एक आहे की त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांची भीती आवश्यक आहे. शरद पवारांची भिती असण्याचं काही कारण नाही. त्यांच्याइतका लोकांमध्ये जाणारा लोकनेता मी पाहिला नाही, असं राऊत म्हणाले. (shivsena leader sanjay raut reaction on sharad pawar statement)

 

संबंधित बातम्या:

‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’; राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचे राऊतांना सॉल्लिड प्रत्युत्तर

शरद पवार की अमित शाह, यांच्यापैकी अधिक भीती कुणाची?, संजय राऊतांचं खोचक उत्तर

राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

(shivsena leader sanjay raut reaction on sharad pawar statement)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI