शिवसेनेनं जम्मूत ‘करुन दाखवलं’, 10 रुपयात जेवणाची थाळी

| Updated on: Oct 23, 2019 | 12:09 PM

नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये शिवसेनेने साहेब खाना नावाने ही योजना सुरु केली आहे. जम्मूतील गरजू लोकांसाठी शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी ही योजना सुरु केली (Shivsena Saheb Khana) आहे.

शिवसेनेनं जम्मूत करुन दाखवलं, 10 रुपयात जेवणाची थाळी
Follow us on

जम्मू : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने वचननाम्यात दहा रुपयात पोटभर जेवणाची थाळी देण्याची घोषणा केली (Shivsena Saheb Khana) होती. या घोषणेवर विरोधकांची सडकून टीकाही केली. मात्र नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये शिवसेनेने ‘साहेब खाना’ नावाने ही योजना सुरु केली आहे. जम्मूतील गरजू लोकांसाठी शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी ही योजना सुरु केली (Shivsena Saheb Khana) आहे.

जम्मूमधील छन्नी हिम्मत परिसरात पहिले केंद्र सुरु करण्यात आले आहे. या योजनेतून दर दिवशी गरजू लोकांना फक्त 10 रुपयात राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी असे पदार्थ दिले जातात. लवकरच जम्मूतील इंद्रा चौकात साहेब खाना ही योजना लवकरच सुरु होणार आहे. तसेच येत्या काही दिवसात बक्षी नगर आणि शालीमार रुग्णालयातही हे सेवा सुरु करण्यात येणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही योजना सुरु करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी दिली. साहेब खाना या योजनेतून दर दिवशी 500 लोकांना दर दिवशी जेवण (Shivsena Saheb Khana) मिळेल.

10 रुपयात थाळी काय ‘मातोश्री’वर बनवून देणार का? : राणे

दरम्यान यापूर्वी अंबरनाथमध्येही अशाचप्रकारे या योजनेचं रोल मॉडेल तब्बल सहा महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलं आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर या तिघांच्या संकल्पनेतून अंबरनाथमध्ये गेल्या 1 मे रोजी 10 रुपयात जेवण ही संकल्पना सुरु करण्यात आली. यामध्ये वरण, भात, भाजी, चपाती आणि एक गोड पदार्थ असं हे जेवण अवघ्या 10 रुपयात दिलं जातं.

शिवसेनेची योजना शक्य, अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून मिळतंय 10 रुपयात जेवण

दरम्यान उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातून अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला होता. यात राज्यात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, 300 युनिटपर्यंतचा विजेचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार आणि सदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी गावोगावी आरोग्य चाचणी केंद्रे उभी करून एक रुपयात हृदयरोग आणि मधुमेह चाचणी केली जाणार असे म्हटलं होतं.