शिवसेनेची योजना शक्य, अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून मिळतंय 10 रुपयात जेवण

वचननाम्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात गोरगरीबांसाठी आम्ही फक्त 10 रुपयात पोटभर जेवण देण्याची योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली (Shivsena 10 rs meal Scheme). शिवसेनेच्या या योजनेचं जीवंत उदाहरण गेल्या सहा महिन्यांपासून अंबरनाथमध्ये पाहायला मिळत आहे. इथे 10 रुपयांमध्ये गोरगरीबांना संपूर्ण जेवण दिलं जातं.

Shivsena 10 rs meal Scheme, शिवसेनेची योजना शक्य, अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून मिळतंय 10 रुपयात जेवण

मुंबई : शिवसेनेचा वचननामा शनिवारी (12 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आला (Shivsena Manifesto). शिवसेनेच्या या वचननाम्यात अनेक योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांपैकी एका घोषणेने मात्र एका नव्या वादाला तोंड फुटलं. वचननाम्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात गोरगरीबांसाठी आम्ही फक्त 10 रुपयात पोटभर जेवण देण्याची योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली (Shivsena 10 rs meal Scheme). त्यानंतर ‘हे शक्य नाही, 10 रुपयात पोटभर जेवण कसं देणार’, असा सवाल विरोधक विचारु लागले. मात्र, शिवसेनेची ही योजना शक्य आहे, याचं जीवंत उदाहरण गेल्या सहा महिन्यांपासून अंबरनाथमध्ये पाहायला मिळत आहे (Shivsena 10 rs meal Scheme).

10 रुपयांत जेवण या योजनेचं रोल मॉडेल अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून सुरू आहे आणि या संकल्पनेला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

अंबरनाथमध्ये या योजनेचं रोल मॉडेल तब्बल सहा महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलं. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर या तिघांच्या संकल्पनेतून अंबरनाथमध्ये गेल्या 1 मे रोजी 10 रुपयात जेवण ही संकल्पना सुरु करण्यात आली. यामध्ये वरण, भात, भाजी, चपाती आणि एक गोड पदार्थ असं हे जेवण अवघ्या 10 रुपयात दिलं जातं.

हेही वाचा : 10 रुपयात थाळी काय ‘मातोश्री’वर बनवून देणार का? : राणे

हे जेवण दहा रुपयात परवडतं का? याबाबत अरविंद वाळेकर यांना विचारलं असता हे जेवण प्रत्यक्षात 20 रुपयाला पडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रोजचा एकूण खर्च हा जवळपास अडीच हजारांच्या घरात जातो. मात्र, दानशूर व्यक्तींच्या देणग्या आणि प्रसंगी खिशातून पैसे टाकून हा खर्च भागवला जात असल्याचं वाळेकर यांनी सांगितलं.

हे जेवण अवघ्या 10 रुपयात मिळत असलं, तरी त्याच्या दर्जात कुठेही कमी पडू दिलं जात नाही. चांगल्या प्रतीचं धान्य वापरुन अतिशय स्वच्छतेत ते शिजवलं जातं. शिवाय, टेबल खुर्च्या लावून व्यवस्थित बसून जेवण्याची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथमधील गोरगरीब लोक, मजूर, कामगार वर्ग आणि रिक्षाचालक हे नेहमीच इथे जेवायसाठी येतात. त्यामुळेच आता राज्यभरात ही योजना राबवली जाणार आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *