10 रुपयात थाळी काय 'मातोश्री'वर बनवून देणार का? : राणे

नारायण राणे आणि शिवसेना यामधील कटुता कमी होण्याच्या चर्चा झडत असतानाच नारायण राणे (ShivSena Manifesto Narayan Rane) यांनी शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका केली.

10 रुपयात थाळी काय 'मातोश्री'वर बनवून देणार का? : राणे

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणे पुन्हा एकदा शिवसेनेवर बरसले आहेत. शिवसेनेने त्यांच्या वचननाम्यात (ShivSena Manifesto Narayan Rane) 10 रुपयात थाळी अशी घोषणा केली आहे. पण ही थाळी ‘मातोश्री’वर बनवून देणार का? असा सवाल राणेंनी केलाय. नारायण राणे आणि शिवसेना यामधील कटुता कमी होण्याच्या चर्चा झडत असतानाच नारायण राणे (ShivSena Manifesto Narayan Rane) यांनी शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका केली.

कटुता संपवायची असेल तर ती दोन्हीकडून संपवायला हवी, असं म्हणत राणेंनी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रहार केला. उद्धव ठाकरे सातबारा कोरा करू असे नेहमी म्हणायचे. पण झाला का कोरा? असा सवाल करून राणेंनी सातबारा कोरा कसा करतात हे माहिती तरी आहे का असा सवाल उपस्थित केला आहे.

शिवसेनेच्या वचननाम्यावर बोलताना ते म्हणाले की, “मला हा वचननामा हास्यास्पद वाटतो. शिवसेना हा वचननामा कसा पूर्ण करणार असा प्रश्न आहे. 10 रुपयात थाळी ‘मातोश्री’वर बनवून देणार काय? 10 रुपयात थाळी द्यायची असेल तर त्यात नुकसान होईल त्याचा निधी कुठून येईल? शिवसेनेने अगोदर त्यांचा जुना वचननामा पाहावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु म्हणायचे. पण झाला का कोरा? उद्धव ठाकरेंनी अगोदर सातबारा कोरा कसा करतात ते समजून घ्यायला हवं. शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रशासनाची माहिती त्यांनी घ्यायला हवी, असंही राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे येत्या बुधवारी सिंधुदुर्गात

उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात तीन सभा घेणार आहेत, ज्यातील पहिली सभा कणकवलीत होईल. कणकवलीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्यासाठी, कुडाळमध्ये पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांच्यासाठी आणि सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. पण कणकवलीतील सभेबाबत उत्सुकता आहे.

कणकवलीत नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश हे भाजपचे उमेदवार आहेत. युतीच्या जागावाटपात कणकवली जागा भाजपकडे असताना शिवसेनेनेही पक्षाचा अधिकृत उमेदवार दिला आहे. नारायण राणे यांचे माजी समर्थक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही कणकवलीत जाहीर सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या व्यासपीठावर नारायण राणे स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *