‘…तर तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासू’, शिवसेना महिला आघाडीचा इशारा

भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी साई संस्थानला केला होता. यावर आता शिवसेनेकडून थेट तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे.

'...तर तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासू', शिवसेना महिला आघाडीचा इशारा
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 5:40 PM

शिर्डी : भक्तांच्या कपड्यासंदर्भात साई संस्थान आणि तृप्ती देसाई यांच्या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी साई संस्थानला केला होता. यावर आता शिवसेनेकडून (Shivsena) थेट तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे. शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आणि तोंडाला काळं फासू असा धमकीवजा इशारा शिवसेना महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी दिला. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. (ShivSena Swati Pardeshi warning to trupti desai on shirdi cloths style case)

शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असाल तर भारतीय पेहरावात यावं. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं होतं. त्यावर तृप्ती देसाई यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे तृप्ती देसाईंविरोधात आता शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाल्या आहेत. शिर्डीत येऊन त्यांनी स्टंटबाजी केली तर शिवसेना स्टाईलने त्यांनी उत्तर देऊ अशी धमकीच शिवसेनेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता तृप्ती देसाई काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

साई मंदिरात येताना भारतीय पेहराव करावा. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असे आवाहन साई संस्थानतर्फे मंगळवारी (30 नोव्हेंबर) ला करण्यात आलं होतं. तशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले होते. यावर बोलताना देसाई यांनी मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल उपस्थित केला होता.

साई संस्थानच्या या आवाहनावर बोलताना, अशा आशयाचे फलक लावणं म्हणजे हा भारतीय संविधानाचा अवमान असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. “शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्तगण देश-विदेशातून येतात. हे भक्त वेगवेगळ्या जातीधर्माचे असतात. शिर्डी संस्थानने मंदिर परिसरात भक्तांनी सभ्य पोशाख घालून यावं या आशयाचा एक बोर्ड लावला आहे. भारत देशात संविधान आहे. संविधानाने अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे कुणी काय बोलाव? काय बोलू नये हा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा संविधानाचा आपमान आहे,” असे त्या म्हणाल्या होत्या. (ShivSena Swati Pardeshi warning to trupti desai on shirdi cloths style case)

तसंच, मंदिरामध्ये कशा पद्दतीचे कपडे घालायला पाहिजेत याचं भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरून ठरवू शकत नाहीत. श्रद्धा महत्वाची असते, असं वक्तव्य त्यांनी साई संस्थानला उद्देशून केलं होतं. त्यामुळे यावर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत तृप्ती देसाईंना इशारा दिला आहे.

इतर बातम्या – 

‘मी असं बोललोच नाही’, तृप्ती देसाईंच्या कायदेशीर नोटीसला इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Shirdi Mandir | साई मंदिरात भारतीय पेहरावात यावं, शिर्डीच्या साई मंदिरात लावले फलक

(ShivSena Swati Pardeshi warning to trupti desai on shirdi cloths style case)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.