शिर्डी साईबाबा मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, सरकारी नियमांची ऐसीतैशी

धार्मिकस्थळे सुरु करताना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सुचना व्यवस्थापन मंडळांना राज्य सरकारने दिल्या असताना शिर्डी साई मंदिरात आणि परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा दुसऱ्याच दिवशी फज्जा उडाला.

शिर्डी साईबाबा मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, सरकारी नियमांची ऐसीतैशी
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 4:16 PM

शिर्डी : दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नियम अटींसह राज्यातील मंदिरे सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. धार्मिकस्थळे सुरु करताना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सुचना व्यवस्थापन मंडळांना राज्य सरकारने दिल्या असताना शिर्डी साई मंदिरात आणि परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा दुसऱ्याच दिवशी फज्जा उडाला. (Social Distance not Followed by Shirdi Sai Temple)

राज्य सरकारने मंदिरं खुली करताना कोव्हिडचा संस‌र्ग होवू नये यासाठी नियमावली आखून दिली. परंतु सरकारच्या नियमांचं पालन होताना दिसत नाही. साईबाबा संस्थानने केलेल्या‌ सगळ्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. ऑनलाईन दर्शनात वेळोवेळी तांत्रिक बिघाड येत असल्याने ऑफलाईन दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.

दर्शन रांगेत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र ऑफलाईन गर्दीच गर्दी होत आहे. गर्दी कमी करण्यासाठी किंवा सुचना देण्यासाठी कोणतेही कर्मचारी दिसत नव्हते. ज्यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनीधी तेथे पोहोचले त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना तेथे पाठवण्यात आले.

भक्तांना सावलीसाठी व्यवस्था नसल्याने कडक उन्हात ताटकळत उभ राहाव लागतंय. जी परिस्थीती ऑफलाईन दर्शन काऊंटर समोर तीच परिस्थीती संस्थानच्या मोबाईल आणि चप्पल स्टँण्ड समोर दिसून येत होती. भाविक दर्शन करून बाहेर पडल्यानंतर मोबाइल काऊंटरला गर्दी करत असल्याच‌ं दिसून आलं. मंदिर संस्थानची ही व्यवस्था देखील कोलमडली आहे. (Social Distance not Followed by  Shirdi SAI Temple)

तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!

तुळजाभवानी मंदिर परिसरात पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं चित्र पहायला मिळालं. त्याचबरोबर भाविक, पुजारी आणि व्यापारी मास्कविना फिरताना पाहायला मिळाले. महत्वाची बाब म्हणजे मंदिर संस्थान, पोलीस आणि नगर परिषदेकडूनही मास्क न वापरणाऱ्यांना रोखण्याची तसदी घेतली गेली नाही. मंदिर परिसरातील हळद-कुंकु, फुले आदी व्यापाऱ्यांनी मास्क न घालता दुकानं बिनदिक्कत सुरु ठेवली होती. इतकच नाही तर सरकारकडून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पण 65 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनाही दर्शनासाठी मंदिरात आणण्यात आलं होतं. दर्शन रांगेतही अनेक भाविक विना मास्क उभे होते. तर थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर यंत्रणाही कार्यान्वित नव्हती.

संबंधित बातम्या

तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!, भाविक, पुजारी, व्यापारीही मास्कविना, ज्येष्ठांनाही मंदिरात प्रवेश

शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअ‍ॅलिटी चेक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.