AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sohail Khan: चेहऱ्यावर सुरकुत्या, अशक्तपणा; अचानक असा का दिसू लागला? सोहेल खानला नेमकं झालं तरी काय? कारण आलं समोर

Sohail Khan: काही दिवसांपूर्वी सोहेल खान एका पार्टीमध्ये दिसला होता. त्यावेळी त्याचा लूक पाहून अनेकांना धक्का बसला होता. कारण चेहऱ्यावर सुरकुत्या, अशक्तपणा स्पष्ट दिसत होता. त्यामुळे सोहेल आजारी असल्याचे बोलले जात होते. आता यावर स्वत: सोहेल खानने प्रतिक्रिया दिली आहे.

Sohail Khan: चेहऱ्यावर सुरकुत्या, अशक्तपणा; अचानक असा का दिसू लागला? सोहेल खानला नेमकं झालं तरी काय? कारण आलं समोर
सोहेल खानImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 16, 2026 | 7:31 AM
Share

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान सध्या त्याच्या लूकमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच सोहेल रिअॅलिटी शो ‘अलायन्स’च्या रॅप-अप पार्टीत सहभागी झाला होता. याच पार्टीतील त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते, जे पाहून चाहत्यांना खूप आश्चर्य वाटले आणि चिंता वाटू लागली. या फोटोंमध्ये सोहेलचे वजन खूप कमी झाल्याचे दिसत होते, तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या होत्या. त्याचा हा लूक पाहून अनेक प्रश्न उपस्थित झाले. काहींना वाटले की सोहेल खान आजारी पडला आहे. तो कोणत्यातरी आरोग्यसमस्येशी झुंज देत आहेत, तर काहींनी अंदाज लावला की कदाचित यामागे GLP-1 वजन कमी करणारी औषधे असू शकतात. आता यावर सोहेलने प्रतिक्रिया आली आहे.

सुरुवातीच्या काही दिवसांत मला थोडी घबराट झाली

सोहेल खानने अलीकडेच एका मुलाखतीत त्याला नेमकं काय झालं आहे याबद्दल सांगितले. सोहेलने सांगितले की त्याचे वजन कमी होण्याचे कारण रिअॅलिटी शोमध्ये आल्यानंतर लगेच झालेली आरोग्यसमस्या होती. अभिनेत्याने सांगितले, ‘सुरुवातीच्या काही दिवसांत मला क्लॉस्ट्रोफोबिक (बंद जागेत वाटणारी भीती) वाटले, कारण मी पहिल्यांदाच कोणत्याही रिअॅलिटी शोचा भाग बनलो होतो. घरात प्रवेश केल्यानंतर पहिल्या आठवड्यातच पोटाच्या आजाराने माझ्या अडचणी आणखी वाढवल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्पर्धकांनी माझ्या आरोग्याबाबत दाखवलेल्या प्रेमामुळे आणि काळजीमुळेच मी पाच आठवडे तिथे राहू शकलो, तरी मी पहिल्या आठवड्यापासूनच आजारी होतो.’

मला फक्त माझ्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवायचे होते

सोहेल पुढे म्हणाला की, ‘मला फक्त माझ्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवायचे होते, कारण मला या चॅलेंजचा भाग राहायचे होते आणि शोदरम्यान मी बनवलेल्या त्या नवीन कुटुंब आणि मित्रांसोबत राहायची इच्छा होतो आणि आता हा संबंध आयुष्यभर राहील. तर ना ओझेम्पिक, ना फॅट बर्नर; मी फक्त सर्वांकडून खूप प्रेम आणि आपलेपणा मिळवला आहे.’

सोहेल खानच्या कामाविषयी

सोहेल खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो तेलुगू चित्रपट ‘अर्जुनः सन ऑफ वैजयंती’मध्ये दिसला होता. याशिवाय सोहेल शेवटचे २०१७ मध्ये आलेला हिंदी चित्रपट ‘ट्यूबलाईट’मध्ये दिसला होता. त्यात त्याने सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. तो त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सोहेल खान प्रोडक्शन्सही चालवतो. या अंतर्गत त्याने ‘राधे’, ‘रेडी’, ‘जय हो’, ‘पार्टनर’ आणि इतर अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. सोहेलने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत ‘मैंने दिल तुझको दिया’ (२००२), ‘डरना मना है’ (२००३), ‘कृष्णा कॉटेज’ (२००४), ‘मैंने प्यार क्यों किया’ (२००५), ‘आई प्राउड टू बी एन इंडियन’ (२००४), ‘सलाम-ए-इश्क’ (२००७) आणि ‘हीरोज’ (२००८) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ