दारुच्या नशेत सतत आईला मारहाण, लातुरात मुलांकडून पित्याची हत्या

वडील सतत आईला दारु पिऊन मारहाण करतात. त्यामुळे दोन मुलांनी पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना लातुरात घडली आहे.

दारुच्या नशेत सतत आईला मारहाण, लातुरात मुलांकडून पित्याची हत्या

लातूर : वडील सतत आईला दारु पिऊन मारहाण करतात (Sons Murder Father In Latur). त्यामुळे दोन मुलांनी पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना लातुरात घडली आहे. याप्रकरणी एका मुलाला अटक केली आहे. तर दुसरा अल्पवयीन मुलगा फरार आहे. पोलीस त्याचा तपास घेत आहेत (Sons Murder Father In Latur).

दारु पिऊन वडील सतत आईला मारहाण करतात आणि घरात सतत भांडण करतात, या कारणावरुन या दोन मुलांनी आपल्या पित्याचीच हत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या शिंदाळवाडी इथे घडली. या प्रकरणी आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी एका भावाला अटक केली, तर अल्पवयीन दुसरा भाऊ फरार आहे.

औसा तालुक्यातल्या शिंदाळवाडी शिवारात मछिंद्र गरड यांचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाबाबत अधिक तपास केला. तपासाअंती मुलांनीच आपल्या पित्याची गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालं. वडील दारु पिऊन सतत आईला मारहाण करतात आणि भांडणे करतात, या कारणावरुन या मुलांनी पित्याची हत्या केल्याचं सांगण्यात येतं आहे.

या प्रकरणी आरोपी कृष्णा गरड आणि त्याच्या अल्पवयीन भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कृष्णा गरडला अटक केली आहे, तर अल्पवयीन भाऊ फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Sons Murder Father In Latur

संबंधित बातम्या :

कल्याण-डोंबिवलीत केटीएम बाईकच्या सहाय्याने चोरी, चोरट्याला अटक

मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी, वसई पोलिसांकडून आरोपीला अवघ्या 4 तासात अटक

जुन्या ओळखीचा फायदा घेत तरुणाला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न, पती-पत्नीसह तिघांना अटक

Published On - 5:29 pm, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI