पुण्यातील मेट्रोचं काम रखडलं, कामगार आणण्यासाठी 4 बस रवाना

पुणे मेट्रोच्या ठेकेदाराने परराज्यातील कामगारांना आणण्यासाठी थेट 4 बस पाठवल्या आहेत (Special buses for Pune Metro labors ).

पुण्यातील मेट्रोचं काम रखडलं, कामगार आणण्यासाठी 4 बस रवाना

पुणे : मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक व्यवसाय उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे अनेक कामगार आपल्या मूळगावी परराज्यात निघून गेले. मात्र, आता थोड्या प्रमाणात उद्योगधंदे किंवा सरकारी कामे सुरु झाले आहेत. मात्र, आता या उद्योगधंद्यांना कामगारांच्या तुटवड्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. याचा फटका थेट पुण्यातील मेट्रोच्या कामांनाही बसला. यावर उपाय म्हणून मेट्रोच्या ठेकेदाराने परराज्यातील कामगारांना आणण्यासाठी थेट 4 बस पाठवल्या (Special buses for Pune Metro labors ). यामुळे आता मेट्रोच्या कामाला वेग येणार आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी स्थलांतरित कामगार कामावर परतत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पावर देखील बिहारमधील पाटणा आणि झारखंडमधील रायपूरचे कामगार काम करतो होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये अनेक कामगार गावाकडे गेले. आता या ठिकाणी देखील कामगारांना पुन्हा कामावर रुजू होत आहेत. या कामगारांना आणण्यासाठी मेट्रोच्या कंत्राटदाराने 3 दिवसांपूर्वी 4 बस पाठवल्या होत्या. त्यामुळे मेट्रोच्या कामाला आता गती मिळणार आहे. बसच्या माध्यमातून 75 कामगार परत कामावर रुजू होणार आहेत. काही कामगारांना रेल्वेचं तिकीटही काढून देण्यात आलं आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात मेट्रोच्या कामावर असणाऱ्या कामगारांसाठी तब्बल 16 ठिकाणी लेबर कॅम्प आहेत. त्यामध्ये 3 हजार कामगार लॉकडाऊनच्या आधी काम करत होते. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मेट्रोचे काम फक्त 20 ते 30 टक्क्यांपर्यंत सुरु होते. आता केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या नियमानुसार काही प्रमाणात काम सुरु आहे. त्यासाठी कामगारांचा तुटवडा जाणवत होता. मात्र, संसर्गामुळे परराज्यात निघून गेलेल्या कामगारांनी परत येण्याची इच्छा दाखवली. त्यामुळे मेट्रो प्रकल्पावर काम करणाऱ्या एका ठेकेदाराने पाटणा, कानपूर, रायपूर येथील कामगारांना परत आणण्यासाठी थेट 4 बस पाठवल्या. त्यामध्ये 75 कामगार परत कामावर परतले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

सध्या मेट्रोचं काम करणाऱ्या कामगारांची संख्या 1340 वर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रो प्रकल्पावर काम करण्यासाठी कामगार कमी होते. त्यामुळे पिंपरी ते स्वारगेट मार्गाचे कामाचा वेग मंदावला होता. मात्र, आता कामगार येऊ लागल्याने हा वेग पुन्हा वाढेल अशी आशा महामेट्रो प्रशासनाकडून केला जात आहे.

हेही वाचा :

पुण्यात महिनाभरात तब्बल 32 हजार परप्रांतिय मजूर, नागरिक दाखल, मेट्रोच्या कामावर 1 हजार मजूर

Pune Metro | मजुरांअभावी पुणे मेट्रोचं काम रखडलं

निम्मे कामगार मूळगावी रवाना, पुणे मेट्रोचे काम लांबण्याची चिन्हं

Special buses for Pune Metro labors

Published On - 9:32 pm, Thu, 9 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI