AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर, एनडीपीएस कोर्टाकडून तात्पुरता दिलासा

रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर, एनडीपीएस कोर्टाकडून तात्पुरता दिलासा
| Updated on: Dec 02, 2020 | 4:27 PM
Share

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविक चक्रवर्ती याचा जामीन अर्ज आज (2 डिसेंबर) मंजूर केला आहे (bail to Showik Chakraborty). अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण (Drugs Connection) समोर आले. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली होती. याप्रकरणी काही ड्रग्ज तस्करांसह, रिया आणि शौविकला अटक करण्यात आली होती (Special NDPS Court grants bail to Showik Chakraborty).

(Special NDPS Court grants bail to Showik Chakraborty)

रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. 5 सप्टेंबरपासून अटकेत असलेल्या  शौविक चक्रवर्तीने 7 नोव्हेंबरला पुन्हा एकदा मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तब्बल 4 वेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आतातरी त्याची सुटका केली जाईल, अशी आशा अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाहोती. शौविकला ड्रग्ज बाळगणे, खरेदी करणे आणि विक्री करणे अशा गंभीर आरोपाखाली तुरुंगात टाकले गेले होते.

नायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर जामिनासाठी खटपट

मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टात शौविकने 7 नोव्हेंबरला पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी एका आदेशात म्हटले होते की, एनसीबी अधिकाऱ्यांच्या समोर दिलेला कबुली जबाब अद्याप कोर्टाने स्वीकारलेला नाही, अशावेळी आरोपींना जबरदस्ती तुरूंगात ठेवता येणार नाही.’ या आदेशानंतर आता पुन्हा एकदा जामिनासाठी शौविकची धडपड सुरू झाली आहे (Special NDPS Court grants bail to Showik Chakraborty).

रियाची सुटका

तब्बल 3 वेळा जामीन अर्ज नाकारल्यानंतर अखेर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. यावेळीही शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. रिया ड्रग्ज सिंडिकेटची (Drug Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे पुरावे NCB देऊ न शकल्याने, रियाला जामीन देण्यात आला होता.

दुसऱ्या व्यक्तीला अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम 27-अ अन्वये अमली पदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले होते.

(Special NDPS Court grants bail to Showik Chakraborty)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.