मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे डीन, राज ठाकरेंकडून कौतुक

हार्वर्ड विद्यापीठाने भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन म्हणून नियूक्ती केली आहे. (Srikant Datar appointed new Dean of Harvard Business School)

मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे डीन, राज ठाकरेंकडून कौतुक
prajwal dhage

|

Oct 10, 2020 | 5:08 PM

हार्वर्ड : भारतीय वंशाचे श्रीकांत दातार(Indian Origin Dean) यांची हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी नियुक्ती झाल्यानं महाराष्ट्राच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला गेला आहे. श्रीकांत दातार हे 2021च्या जानेवारी महिन्यात पदभार स्वीकारणार आहेत. दातार हे मागील 25 वर्षांपासून हार्वर्ड विद्यापीठात सेवा बजावत असून, आता त्यांना डीनपदी बढती मिळाली आहे. श्रीकांत दातार (Srikant Datar) हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन पदावर विराजमान होणारे सलग दुसरे भारतीय वंशाचे प्राध्यापक आहेत. (Srikant Datar appointed new Dean of Harvard Business School)

विशेष म्हणजे श्रीकांत दातार महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील त्यांचे अभिनंदन केले आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून श्रीकांत दातार यांची नियुक्ती ही अभिमानाची बाब असल्याचं म्हणत मराठी पाऊल असेच पुढे पडत राहावे, अशी आशा व्यक्त केली. (Srikant Datar appointed new Dean of Harvard Business School)

हार्वर्ड विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी श्रीकांत दातार यांच्या नियुक्तीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, श्रीकांत दातार हे हार्वर्ड विद्यापीठाच्या 112 वर्षांच्या इतिहासातले 11 वे डीन आहेत. दातार येत्या जानेवारी महिन्यात सध्याचे डीन नितीन नोहारिया (Nitin Nohariya) यांच्याकडून पदभार स्वीकारतील. नितीन नोहारिया यांनी दशकभरापासून डीनपदी राहून सेवा दिलेली आहे. ते येत्या डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होतील.

श्रीकांत दातार यांचा कॉस्ट मॅनेजमेंटमध्ये हातखंडा

भारतीय वंशाचे श्रीकांत दातार हे मागील 25 वर्षांपासून हार्वर्ड विद्यापीठात सेवा देत आहेत. त्यांनी स्टॅन्डफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं. कॉस्ट मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स या क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इनोव्हेटिव्ह प्रॉब्लेम स्वॉल्व्हिंग आणि मशीन लर्निंग या विद्याशाखेत ते निपुण आहेत. श्रीकांत दातार हे नोवार्टिस एजी आणि टी-मोबाईल यूएस इंकसोबतच कित्येक कंपन्यांच्या बोर्डातही सहभागी आहेत. श्रीकांत दातार यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीतून डिस्टिंग्शनसहित बीएचे शिक्षण पूर्ण केले. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) मिळवलेली आहे. तसेच दातार यांनी सांख्यिकी आणि अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच स्टॅन्डफोर्ड विद्यापीठातून त्यांनी बिझनेसमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.

दरम्यान, हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष लॉरेन्स बको यांनी मराठमोळ्या श्रीकांत दातार यांच्या नियुक्तीनंतर आनंद व्यक्त केला. श्रीकांत दातार व्यापक दृष्टिकोन ठेवून विद्यापीठाच्या हितासाठी काम करतील असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

Nobel Prize 2020 Photos: कुणाला, कोणता नोबेल पुरस्कार मिळाला, पुरस्कार्थींची संपूर्ण यादी

पेनरोज यांच्या नोबेलमध्ये भारतीय शास्त्रज्ञाचं मोठं योगदान, अमल कुमारांच्या अनोख्या समीकरणानं ब्‍लॅक होलचं गुपित उघड

Nobel Prize in Physics | 1901 पासून आतापर्यंत भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या 4 महिला संशोधक

(Srikant Datar appointed new Dean of Harvard Business School)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें