‘एफटीआयआय’ आणि एसआरएफटीआय’ यापुढे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर?

प्रवेश परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क वाढीच्या विरोधात पुणे येथील "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया" (एफटीआयआय) आणि कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआरएफटीआय) या दोन संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मागील 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केलं आहे (Fee hike of FTII and SRFTI).

'एफटीआयआय' आणि एसआरएफटीआय' यापुढे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर?
Follow us
| Updated on: Dec 19, 2019 | 11:13 PM

पुणे : प्रवेश परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क वाढीच्या विरोधात पुणे येथील “फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया” (एफटीआयआय) आणि कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआरएफटीआय) या दोन संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मागील 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केलं आहे (Fee hike of FTII and SRFTI). मात्र, अद्याप संस्थेच्या संचालकांकडून उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना कसलंही आश्वासन मिळालेलं नाही. प्रशासनाने केलेल्या बेसुमार प्रवेश परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क वाढीमुळे आता या नामांकित संस्था यापुढे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याचंच यातून दिसत आहे (Fee hike of FTII and SRFTI).

दोन्ही संस्थांनी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे. 16 डिसेंबरपासून 2018 च्या बॅचमधील समद्रिता घोष आणि के. ओ. अखिल हे दोन विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

यासंदर्भात समद्रिता घोष या विद्यार्थीनीची आई अनुराधा घोष म्हणाल्या, “अव्वाच्या सव्वा फी वाढीच्या विरोधात 16 डिसेंबर 2019 पासून ‘एफटीआय’ मध्ये सुरू असलेल्या उपोषणात माझी मुलगी सहभागी झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांची मुले शैक्षणिक कर्ज काढून ‘एफटीआय’ मध्ये प्रवेश घेत असतात. या फी वाढीमुळे त्यांच्यावर मोठा बोजा पडणार आहे. त्यामुळे इथे प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांवर हा निर्णय अन्यायकारक आहे. आम्हीसुद्धा शैक्षणिक कर्ज काढून तिचे शिक्षण करत आहोत.”

सध्या उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या विद्यार्थ्यांसह दोन्ही संस्थांमधील सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आणि तोडगा काढण्याचे आवाहन उपोषणकर्त्या विद्यार्थीनीची आई अनुराधा यांनी केलं आहे.

‘एफटीआय’ चे 4000 ते 10000 हे प्रवेश परीक्षा शुल्क समाजातील मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरचं आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील वरील दोन्ही प्रमुख आणि प्रतिष्ठित संस्थांचा उद्देश मुळी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सिनेमाशी संबंधित उच्च शिक्षण परवडणाऱ्या शुल्कात मिळावे हा होता. पण या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. गेल्या 4 वर्षात वाढलेलं शैक्षणिक शुल्क आणि यावर्षी वाढवण्यात आलेलं प्रवेश परीक्षा शुल्क पाहता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या दोन्ही संस्था यापुढे स्वप्नवत ठरणार आहेत. मूळ उद्देशापासून ढळलेल्या या संस्था आज नफा कमावण्याचं साधन बनल्या आहेत का असा प्रश्न आता विद्यार्थी विचारत आहेत.

उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून अद्याप कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. यावर चर्चा करण्यासाठी प्रशासनाने बोलावलेली शैक्षणिक परिषदेची खास बैठक 27 डिसेंबर 2019 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. म्हणजे या बैठकीला अजून 8 दिवस आहेत. मात्र, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पालकांनी ही बैठक तात्काळ घेण्याची मागणी केली आहे. मात्र, माहिती व प्रसारण खात्याकडून वेळकाढूपणाचं धोरण अवलंबलं जात आहे.

कोलकता येथील ‘एसआरएफटीआय’ची विद्यार्थी संघटनासुद्धा उपोषणात सामील आहे. दोन्ही संस्थांचे मिळून 11 विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत असतानाही ‘एफटीआय’च्या अध्यक्षांनी शैक्षणिक परिषदेची बैठक तातडीने घेण्याची मागणी धूडकावली आहे. माहिती व प्रसारण खाते विद्यार्थी संघटनांच्या इमेल आणि फोनला प्रतिसाद देत नसल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ‘एफटीआय’चे 400 हून अधिक माजी विद्यार्थी जगभरात विखुरलेले आहेत. या माजी विद्यार्थ्यांची चित्रपट क्षेत्रात दिग्गज म्हणून ख्याती आहे. त्यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

फी वाढीबद्दल संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचा निषेध केला असून शुल्कवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी एका पत्रकातून केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून उपोषणकर्त्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, असंही आवाहन त्यांनी संबंधित मंत्रालयाला केलं आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

उपोषणकर्त्यांची खालावत चाललेली प्रकृती लक्षात घेता, शैक्षणिक परिषदेची बैठक तातडीने ‘एफटीआय’च्या परिसरात व्हावी आणि या बैठकीत विद्यार्थी प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्यात यावं, अशी मागणी आता विद्यार्थ्यांनी केली आहे. या आंदोलनाकडे प्रशासन डोळेझाक करत असल्यामुळे माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशीही मागणी केली जात आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.