AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | रियाची सुशांतवर काळी जादू, सुशांतच्या बहिणीचे गंभीर आरोप

रियाने सुशांतवर काळी जादू केली आणि सुशांतला मानसिक त्रास दिल्याचा आरोप सुशांतची बहीण मितू सिंहने केला आहे.

Sushant Singh Rajput | रियाची सुशांतवर काळी जादू, सुशांतच्या बहिणीचे गंभीर आरोप
| Updated on: Jul 31, 2020 | 10:47 PM
Share

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांतची (Sushant Singh Rajputs Sister Mitu Singh) मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. त्यानंतर आता सुशांतच्या बहिणीने रियावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. रियाने सुशांतवर काळी जादू केली आणि सुशांतला मानसिक त्रास दिल्याचा आरोप सुशांतची बहीण मितू सिंहने बिहार पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे (Sushant Singh Rajputs Sister Mitu Singh).

रियाकडून सुशांतवर काळी जादू, सुशांतच्या बहिणीचा आरोप

मुंबईत येऊन बिहार पोलीस ताकदीने कामाला लागले आहेत. सुशांतने आत्महत्या का केली?, याचं कारण शोधण्यासाठी सुशांतच्या बँक डिटेल्सपासून ते मित्र आणि सुशांतच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरु आहे. त्यातच आता बिहार पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांतची बहीण मितूने रिया चक्रवर्तीवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“रियाने सुशांतला काळ्या जादूने आपल्या वशमध्ये केलं होतं. ज्यामुळे माझा भाऊ रियाच्याच मनाने वागत होता. रियाने भूत-प्रेताच्या कहाण्या सांगून सुशांतचं घरही बदलून घेतलं होतं. भूत-प्रेताच्या गोष्टी सांगून सुशांतला रियाने मुंबई एअरपोर्टजवळील एका रिसॉर्टमध्ये राहायलाही नेलं होतं. जिथे रियाचं कुटुंबही सोबत राहत होतं. सुशांतला वारंवार सांगितलं जात होतं की, काहीही तो बडबड करतो आणि त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी सुशांतला पाटण्याला आणायला गेली, त्यावेळी सुशांतला माझ्यासोबत येऊ दिलं नाही. कुटुंबापासून सुशांतला दूर करण्याचा प्रयत्न झाला”, असा आरोप मितू सिंहने बिहार पोलिसांनी दिलेल्या जबाबात केला आहे (Sushant Singh Rajputs Sister Mitu Singh).

रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रीया

दुसरीकडे, आता रियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बिहार पोलिसांकडूनही या व्हिडीओची चौकशी सुरु झाली आहे. या व्हिडीओत ती आपल्या बॉयफ्रेंडला गुंडा म्हणत आहे.

दुसरीकडे, मुंबईत आलेलं बिहार पोलिसांचं पथक सुशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉल डिटेल्स रेकॉर्डद्वारे सुशांत शेवटच्या काही दिवसांत ज्यांच्याशी बोलला, त्यांचेही जबाब नोंदवणार आहे. तर, बिहार पोलिसांना मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप बिहार सरकारकडून सुरु झाला आहे. मात्र, बिहार पोलिसांनी चौकशीसाठी परवानगीच घेतली नसल्याचं गृहराज्य मंत्री शंभूराज देसाईंचं म्हणणं आहे.

रिया चक्रवर्तीचा व्हिडीओ व्हायरल

रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात रियाकडून खंडणीचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत रियाने खुलासा केला आहे.

“माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल. माझ्याबद्दल प्रसारमाध्यमात खूप वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत. पण, माझ्या वकीलांनी मला याबाबत भाष्य करण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. याप्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल, सत्यमेव जयते!” असे या व्हिडीओत रियाने म्हटलं आहे.

सुशांतच्या खात्यातून 15 कोटींची अफरातफर केल्याचा वडिलांचा आरोप

सुशांत सिंहच्या वडिलांनी रियाने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ईडीने मनी लॉड्रिंगची बाजू तपासून पाहत आहे. पण, सीबीआयबरोबरच ईडीकडूनही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात संपूर्ण फोकस आता रिया चक्रवर्तीवरच आला आहे आणि रिया अजूनही बिहार पोलिसांच्या हाती लागलेली नाही. मात्र, प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न बिहार पोलिसांचा दिसत आहे.

Sushant Singh Rajputs Sister Mitu Singh

संबंधित बातम्या :

फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी, सुशांत प्रकरणात नव्या घडामोडी, रियाचा खंडणीबाबतचा व्हिडीओ व्हायरल

Sushant Death | आधी कंपनीच्या नावात ‘रिया’लिटी शब्द आणला, मग संचालकपद सोडले, रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.