सुष्मिताकडून पहिल्यांदाच बॉयफ्रेण्डसोबतचा फोटो शेअर

सुष्मिताकडून पहिल्यांदाच बॉयफ्रेण्डसोबतचा फोटो शेअर

मुंबई : भारताची पहिली मिस यूनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतचा रोमाँटिक फोटो शेअर केला आहे. सुष्मिताने हा फोटो आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. या फोटोमध्ये सुष्मिता आणि बॉयफ्रेंड रोहमनसोबत तिच्या दोन मुलीही आहेत. सुष्मिताने पहिल्यांदाच तिच्या दोन मुली आणि बॉयफ्रेण्डसोबतचा फोटो शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता आणि रोहमन शॉल एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण बातम्यांना दोघांनी कुठलाही दुजोरा दिलेला नाही. रोहमन हा मॉडेलिंग करतो. सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी रोहमन लहान आहे.

या फोटोमध्ये सुष्मिताच्या मुली आनंदात दिसत आहेत. रिनी आणि आलिशा असं या दोन्ही मुलींचं नावं आहे.

1994 ला सुष्मिताने मिस यूनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावला होता. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. 1996 ला ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसेच, हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत तिने काही तमिळ व इंग्लिश भाषांतील चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

#duggadugga ❤️

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI