ताडोबा गाईडसाठी नवे नियम, भाषेच्या ज्ञानासह शैक्षणिक पात्रतेतही मोठे बदल

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता गाईडची शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी करण्यात (Tadoba Guide Rules Change) आली आहे.

ताडोबा गाईडसाठी नवे नियम, भाषेच्या ज्ञानासह शैक्षणिक पात्रतेतही मोठे बदल
Follow us
| Updated on: Mar 01, 2020 | 12:41 PM

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता गाईडची शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी करण्यात (Tadoba Guide Rules Change) आली आहे. तसेच मराठी आणि हिंदी भाषेसोबतच इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक केलं आहे. देशी-विदेशी पर्यटकांशी योग्य संवाद साधला जावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे नियम नव्या गाईड भरतीसाठी लागू (Tadoba Guide Rules Change) होणार आहेत.

चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध व्याघ्र दर्शन केंद्र आहे. यामुळं इथं देशभरातील पर्यटकांसह परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येनं येतात. या पर्यटकांना सफारीसाठी एक गाईड दिला जातो. हा गाईड आपल्या ज्ञानानुसार पर्यटकांना जंगल आणि प्राण्यांची माहिती देतो. पण सध्या कार्यरत असलेले गाईड्स हे माहितीच्या दृष्टीनं परिपूर्ण नसून, त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञानही नाही, अशा तक्रारी नेहमी येऊ लागल्या. त्यामुळे आता गाईडच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.

जागतिक पातळीवरचा हा प्रकल्प असल्यानं पर्यटकांना प्रकल्प-जंगल-वैविध्य याबाबत भरपूर माहिती त्यांच्या भाषेत देणं गरजेचं आहे. मात्र तसं होत नव्हतं. यामुळं काही रिसोर्टमालकांनी स्वतःकडे गलेलठ्ठ पगारावर निसर्ग तज्ज्ञ ( Naturalists) ठेवले आणि त्यांना पर्यटकांसोबत ते पाठवायचे. एकीकडे तगड्या पगारावर असलेले निसर्ग तज्ज्ञ आणि दुसरीकडे ताडोबाच्या गाईड्सना एक फेरीचे मिळणारे 350 रुपये यात संवाद कौशल्याचा अभाव जाणवू लागला. या पार्श्वभूमीवर ताडोबा व्यवस्थापनानं ‘नवीन गाईड’ हे बारावी उत्तीर्ण आणि तिन्ही भाषांचं ज्ञान असणारेच हवेत असा नवा नियम केला आहे.

विद्यमान गाईड्स हे ताडोबालगतच्या गावातील आहेत. हाताला काम मिळावं म्हणून गावातील थोड्याफार जाणकार लोकांना गाईड म्हणून आतापर्यंत घेण्यात आलं. पण आता सुधारणा केली जाणार आहे. नवीन गाईड्सना घेताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वनगुन्हे असता कामा नये, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.