Tata Nexon चं लिमिटेड एडिशन मॉडेल Kraz लाँच, किंमत तब्बल…

Nupur Chilkulwar

|

Updated on: Sep 09, 2019 | 10:42 PM

Tata Motors ने त्यांची प्रसिद्ध सब-कॉम्पॅक्ट SUV Nexon चं लिमिटेड एडिशन मॉडेल लाँच केलं. Tata Nexon Kraz नावाने लाँच करण्यात आलेल्या या स्पेशल एडिशन मॉडेलची किंमत 7.58 लाख ते 9.18 लाख रुपयांपर्यंत आहे. हे नवं मॉडेल दोन व्हेरिएंटमध्ये (Kraz आणि Kraz+) उपलब्ध आहे.

Tata Nexon चं लिमिटेड एडिशन मॉडेल Kraz लाँच, किंमत तब्बल...

मुंबई : Tata Motors ने त्यांची प्रसिद्ध सब-कॉम्पॅक्ट SUV Nexon चं लिमिटेड एडिशन मॉडेल लाँच केलं. Tata Nexon Kraz नावाने लाँच करण्यात आलेल्या या स्पेशल एडिशन मॉडेलची किंमत 7.58 लाख ते 9.18 लाख रुपयांपर्यंत आहे (Tata Nexon Kraz launched). हे नवं मॉडेल दोन व्हेरिएंटमध्ये (Kraz आणि Kraz+) उपलब्ध आहे. Tata Motors ने SUV Nexon च्या 1 लाख युनिट विक्रीला सेलिब्रेट करण्यासाठी हे स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केलं आहे.

Nexon Kraz ड्यूअल-टोन कलरमध्ये लाँच करण्यात आली आहे. याची बॉडी काळ्या रंगाची आहे तर रुफ सिल्व्हर रंगाचं आहे. त्याशिवाय विंग मिरर्स, अलॉय व्हील आणि फ्रंट ग्रीलवर ऑरेंज हायलाईट्स देण्यात आलं आहे. एसयुव्हीच्या आतही सीट आणि एसी व्हेंट्सवर ऑरेंज हायलाईट्स आहेत. त्याशिवाय, डॅशबोर्ड, सेंटर कंसोल आणि दारांवर पियानो ब्लॅक फिनिश देण्यात आली आहे.

फीचर्स

Tata Motors Nexon Kraz स्टॅण्डर्ड नेक्सॉनच्या XM व्हेरिएंटवर आधारित आहे. यामध्ये ब्लुटूथ कनेक्टिव्हीटीसोबतच हार्मनचा 4-स्पीकर इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टिअरिंग माउंटेड ऑडियो कंट्रोल, फ्रंट 12V आऊटलेट, फॉलो-मी-होम हेडलॅम्प आणि पावर फोल्डिंग विंग मिरर्स आहेत. यामध्ये स्पेशल एडिशन कव्हरसोबत स्टील व्हील्ज देण्यात आले आहेत.

इंजिन

नेक्सॉनचं हे लिमिटेड एडिशन मॉडेल पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 110hp पावरचं 1.2-लीटर पेट्रोल आणि 110hp पावरचं 1.5-लीटर डिझेल इंजिन आहे. दोन्ही इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचं ऑप्शनही देण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

TVS ची नवी स्टार सिटी प्लस, किंमत फक्त….

नवीन Maruti Brezza लवकरच लाँच होणार, पाहा खास फीचर्स

Hero Splendor iSmart 110 चा बीएस-6 मॉडेल लवकरच लाँच होणार

Evolet च्या 3 ई-स्कूटर आणि 1 ई-क्वॉड-बाईक लाँच, किंमत फक्त…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI