नवीन Maruti Brezza लवकरच लाँच होणार, पाहा खास फीचर्स

मारुती Vitara Brezza च्या विक्रीला बुस्ट करण्याच्या विचारात आहे (Maruti Vitara Brezza). त्यामुळे कंपनी लवकरच या गाडीला पेट्रोल इंजिनसोबत बाजारात उतरवू शकते. तसेच, यामध्ये CNG व्हेरिएंटही लाँच होण्याची शक्यता आहे (Maruti Vitara Brezza CNG).

नवीन Maruti Brezza लवकरच लाँच होणार, पाहा खास फीचर्स

मुंबई : प्रसिद्ध कार कंपनी Maruti Suzuki ची Vitara Brezza भारतात खूप लोकप्रिय आहे. Hyundai Venue लाँच व्हायच्या आधीपर्यंत ही गाडी तीन वर्षांपर्यंत बेस्ट सेलर होती. आता मारुती Vitara Brezza च्या विक्रीला बुस्ट करण्याच्या विचारात आहे (Maruti Vitara Brezza). त्यामुळे कंपनी लवकरच या गाडीला पेट्रोल इंजिनसोबत बाजारात उतरवू शकते. तसेच, यामध्ये CNG व्हेरिएंटही लाँच होण्याची शक्यता आहे (Maruti Vitara Brezza CNG).

CNG इंजिन सेगमेंटची पहिली गाडी

जर कंपनी Vitara Brezza ला CNG सोबत लाँच करेल, तर ही CNG इंजिन असलेली पहिली गाडी असेल. BS6 एमिशन नॉर्म्समुळे कंपनीने लहान डिझेल गाड्यांचं उत्पादन बंद केलं आहे.

Vitara Brezza मध्ये काय खास?

रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकीच्या नवीन Vitara Brezza मध्ये सनरुफ आणि साईड एअरबॅग्स दिल्या जाऊ शकतात. कंपनीने मल्टीपल एअरबॅग्स आणि सनरुफसाठी वेंडर्सकडून नोटीस इनव्हाईटिंग टेंडर (NIT) मागवले आहेत. मारुती ब्रेझाचे Hyundai Venue, Ford EcoSport आणि Mahindra XUV300 हे तीन प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. या गाड्यांना टक्कर देण्यासाठी मारुती ब्रेझामध्ये हे फीचर्स अॅड करणार असल्याची चर्चा आहे.

नवीन Vitara Brezza मध्ये पेट्रोल इंजिन असेल, अशीही माहिती आहे. यामध्ये Maruti Suzuki Ciaz मधील 1.5-लीटर, 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन देणार असल्याची शक्यता आहे. हे इंजिन 103bhp पॉवर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करतं. ब्रेझाच्या सध्याच्या मॉडेलमध्ये 1.3-लीटरचं डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 89 bhp पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करतं.

काही रिपोर्ट्सनुसार, नवीन ब्रेझामध्ये 1.5 लीटरचं डिझेल इंजिन असेल. पण, मारुती सुझुकीने बीएस6 एमिशन नॉर्म्स लागू झाल्यानंतर एप्रिल 2019 पासून डिझल इजिन गाड्यांचं उत्पादन थांबवल्याची घोषणा केली होती. त्यामुळे नवीन ब्रेझामध्ये डिझेल इंजिन असेल की, नाही याबाबत संभ्रम आहे.

संबंधित बातम्या :

Hero Splendor iSmart 110 चा बीएस-6 मॉडेल लवकरच लाँच होणार

Evolet च्या 3 ई-स्कूटर आणि 1 ई-क्वॉड-बाईक लाँच, किंमत फक्त…

Renault ची MPV Triber लाँच, किंमत फक्त…

Tata Harrier Dark Edition च्या फोटोनंतर आता किंमतही लीक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *