6GB रॅम, 48MP कॅमेरा, Tecno Spark 7 Pro बाजारात, फोनवर 10% डिस्काऊंट

Tecno Spark 7 Pro मोठ्या डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. यात मोठी 5000mAh क्षमतेची बॅटरी देखील आहे.

6GB रॅम, 48MP कॅमेरा, Tecno Spark 7 Pro बाजारात, फोनवर 10% डिस्काऊंट
Tecno Spark 7 Pro

मुंबई : Tecno ने स्पार्क 7 प्रो (Spark 7 Pro) स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्पार्क 7 सिरिजमधील 90 हर्ट्ज रीफ्रेश रेट असलेला फोन आहे. टेक्नो हा चीनच्या Transsion Holdings चा एक ब्रँड आहे, जो भारत आणि इतर बाजारात Itel आणि Infinix अंतर्गत स्मार्टफोन विकतो. (Tecno Spark 7 Pro Sale live on Amazon with 10 percent Discount, Check price and specifications)

Tecno Spark 7 Pro मोठ्या डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. यात मोठी 5000mAh क्षमतेची बॅटरी देखील आहे. कंपनीने दावा केला आहे की, या फोनमधील बॅटरी 34 दिवसांचा स्टँडबाय टाईम देऊ शकते. टेकनो स्पार्क 7 प्रो मध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हा एक चांगला बजेट फोन सिद्ध होतो.

Tecno Spark 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 7 Pro हा एक बजेट स्मार्टफोन आहे जो काही चांगल्या फीचर्ससह येतो. फोनमध्ये टीअरड्रॉप स्टाईल नॉचसह 6.6 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आहे, त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये स्क्रोलिंग, गेमिंग आणि इतर गोष्टी सहज वाटतील. या फोनच्या मागील बाजूस 3D आर्टचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे या फोनला अतिशय आकर्षक मिळतो.

या फोनच्या मागील बाजूस, कॅमेरा सिस्टममध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एआय कॅमेरा समाविष्ट आहे. Tecno ने या फोनबाबत म्हटलं आहे की, या फोनचा मुख्य कॅमेरा 2K QHD रिझोल्यूशनवर व्हिडिओ शूट करू शकतो. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला सेल्फी कॅमेर्‍यासाठी ड्युअल फ्लॅश मिळेल.

Tecno Spark 7 Pro मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी 80 प्रोसेसरसह 6 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच यात 64GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे, परंतु आपण मायक्रो एसडी कार्ड वापरुन स्टोरेज स्पेस वाढवू शकता. यात आय-ट्रॅकिंग फीचर देखील आहे. टेकनो स्पार्क 7 प्रोमध्ये फेसलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर असे फीचर्स देण्यात आले आहेत.

Tecno Spark 7 Pro किंमत

Tecno Spark 7 Pro हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे, तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणार्‍या व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये इतकी आहे. एसबीआय डेबिड कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआय पेमेंट पर्यायांवर कंपनीने 10 टक्के सूट दिली आहे. ही ऑफर क्लेम केल्यास या फोनच्या बेस मॉडेलसाठी तुम्हाला 8,999 रुपये मोजावे लागतील. तर दुसर्‍या व्हेरिएंटसाठी 9,900 रुपये द्यावे लागतील. स्पार्क 7 प्रो अ‍ॅमेझॉनवर अ‍ॅल्प्स ब्लू, स्प्रूस ग्रीन आणि मॅग्नेट ब्लॅक कलर पर्यायांसह उपलब्ध आहे.

इतर बातम्या

15 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, जाणून घ्या टॉप 5 स्मार्टफोन्सचे फीचर्स

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 6GB रॅमसह दमदार फोन बाजारात, किंमत 10,000 रुपयांहून कमी

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…