अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील रेड स्टेट, पर्पल स्टेट, डेलीगेटस्, काँग्रेस नक्की काय आहेत या संज्ञा?

अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ब्लू स्टेट, रेड स्टेट, पर्पल स्टेट अब्सेंटी वोटिंग, डेलीगेटस, कॉकस, प्राईमरीज अशा विविध संकल्पना पाहायला मिळतात. प्रत्येक संकल्पनेचा वेगळा अर्थ आहे. (Terminology or the things you should know about US Presidential Election )

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील रेड स्टेट, पर्पल स्टेट, डेलीगेटस्, काँग्रेस नक्की काय आहेत या संज्ञा?
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 8:38 PM

नवी दिल्ली: संपूर्ण जगांचं लक्ष अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होत आहे. रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन निवडणूक लढवत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया भारताच्या तुलनेत दिर्घकाळ चालते. 3 नोव्हेंबरला मतदान होणार असले तरी नवा राष्ट्राध्यक्ष जानेवारीमध्ये शपथ घेणार आहे. जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं पाहायला मिळालं आहे.  (Terminology or the things you should know about US Presidential Election )

अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ब्लू स्टेट, रेड स्टेट, पर्पल स्टेट अब्सेंटी वोटिंग, डेलीगेटस, कॉकस, प्राईमरीज अशा विविध संकल्पना पाहायला मिळतात. प्रत्येक संकल्पनेचा वेगळा अर्थ आहे.

अब्सेंटी वोटिंग

मतदार मतदान करण्यासाठी ज्यावेळी पोलिंग बुथवर जाऊ शकत नाही. तेव्हा तो त्याचे मत अब्सेंटी वोटिंगद्वारे मेलवरुन पाठवतो. यासाठी मतदार मतदान केंद्रावर का जाऊ शकत नाही याचे कारण वैध कारण द्यावे लागते.

बॅटलग्राऊंड स्टेट/ पर्पल स्टेट/ स्विंग स्टेट

अमेरिकेच्या ज्या राज्यांमध्ये डेमोक्रेटस आणि रिपब्लिकन पक्षांच्या उमेदावारांना समान मते मिळतात. या राज्यातील मतदानाचा पॅटर्न निश्चित नसतो. येथून कधी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाला मतदान होते. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालामध्ये येथील मतदार निर्णायक भूमिका बजावतात. बॅटलग्राऊंड स्टेटसला पर्पल स्टेट किंवा स्विंग स्टेट म्हणतात. फ्लोरिडा, ओहायो आणि पैन्सिलवेनिया या राज्यांचा समावेश होतो.

ब्लू स्टेटस

डेमोक्रॅटिक पक्षाचा गड असणाऱ्या राज्यांना ब्लू स्टेटस म्हणले जाते. येथील मतदार डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात.

रेड स्टेटस

रिपब्लिकन पक्षाचा गड असणाऱ्या राज्यांना रेड स्टेटस म्हणतात. या राज्यामधील मतदारांचा कल रिपब्लिकन पक्षाकडे असतो.

कॉकस

राष्ट्राध्यक्ष पदाच्या की रेसमध्ये पक्षाचा उमेदवार निवडण्यासाठी पार्टीच्या रजिस्टर्ड सदस्यांची एक बैठक होते.या बैठकीत उमेदवाराच्या नावाची चर्चा होते. बैठकीला उपस्थित असलेले लोक आवाजी मतदानाने हात उंचावून उमेदवार निवडतात. याला कॉकस म्हटले जाते. कॉकसमध्ये उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. उमेदवारांचे समर्थक, त्यांचे वाद-विवाद या सर्व गोष्टी झाल्यानंतर योग्य उमेदवार निवडला जातो.

प्राईमरीज

नॅशनल कन्वेंशनमध्ये डेलीगेट्सचे नामांकन करण्यासाठी राज्य-आयोजित निवडणुकीला प्राईमरीज म्हटलं जातं. मतदार त्यांच्या आवडीच्या उमेदवारांना मतदान करतात अणि निवडून आलेला डेलीगेटस राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मतदान करतात. प्राईमरीजची निवड करण्याच्या दोन पद्धती असतात. गुप्त आणि खुल्या पद्धतीने मतदान होते. गुप्त पद्धतीत पार्टीचे सदस्य डेलीगेटसला मतदान करतात. तर, खुल्या प्राईमरीजमध्ये जनता देखील डेलीगेटसना मतदान करु शकते.

काँग्रेस

प्रतिनिधी सभा (House of Representatives) आणि सिनेट मिळून काँग्रेस तयार होते. काँग्रेस अमेरिका सरकारची विधीमंडळ शाखा (legislative branch)आहे. प्रतिनिधी सभेमध्ये 438 आणि सिनेटमध्ये100 सदस्य असतात.

कन्वेंशन

डेलीगेट्स एकत्र येऊन राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार निवडतात त्या बैठकीला कन्वेंशन म्हटले जाते.

डेलीगेट्स

प्राईमरीज और कॉकस नंतर जे प्रतिनिधी राज्यांकडून नामनिर्देशित केले जातात, त्यांना डेलीगेटस म्हटले जाते. डेलीगेटस राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार निवडतात. प्रत्येक राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर डेलीगेटसची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

इलेक्शन डे

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी मतदान होते.

इलेक्टोरल कॉलेज

इलेक्टोरल कॉलेज पद्धतीमध्ये सर्व राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात इलेक्टर्स होते. जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये जास्त इलेक्टर्स असतात. एकूण 538 इलेक्टर्स मतदान करतात. यापैकी 270 इलेक्ट्रोल वोट मिळतात तो उमेदवार विजयी होतो.

सुपर ट्यूजडे (Super Tuesday)

सुपर ट्यूजडे ला अनेक राज्यांमध्ये प्राईमरीजचे आयोजन केले जाते. साधारणपणे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सुपर ट्युजडे असतो.

संबंधित बातम्या :

ट्रम्प यांच्या 18 रॅलीतील 30 हजाराहून अधिक सहभागींना कोरोना, 700 जणांचा मृत्यू : अहवाल

US Election 2020: ट्रम्प यांना मागे टाकत 8 अंकांनी बायडेन आघाडीवर – सर्वे

(Terminology or the things you should know about US Presidential Election )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.