AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Live : ठाकरे सिनेमाची उत्सुकता, उत्साह आणि जल्लोषी स्वागत

Thackeray मुंबई: देशभरात आज ठाकरे सिनेमाचीच चर्चा सुरु आहे. मुंबईत पहाटे 4.15 वा ठाकरे सिनेमाचा पहिला शो सुरु झाला. मुंबईसह महाराष्ट्रात ठाकरे सिनेमा पाहण्यासाठी शिवसैनिकांची झुंबड उडाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची निर्मिती, मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांचं दिग्दर्शन आणि अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) यांनी साकारलेली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा पाहण्याची […]

Thackeray Live : ठाकरे सिनेमाची उत्सुकता, उत्साह आणि जल्लोषी स्वागत
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
Share

Thackeray मुंबई: देशभरात आज ठाकरे सिनेमाचीच चर्चा सुरु आहे. मुंबईत पहाटे 4.15 वा ठाकरे सिनेमाचा पहिला शो सुरु झाला. मुंबईसह महाराष्ट्रात ठाकरे सिनेमा पाहण्यासाठी शिवसैनिकांची झुंबड उडाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची निर्मिती, मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांचं दिग्दर्शन आणि अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) यांनी साकारलेली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा पाहण्याची उत्सुकता अवघ्या मराठी जनांना आहे.अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची अर्थात बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने मानापमान नाट्य रंगलं. दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र हे सर्व मागे सोडत आज ठाकरे सिनेमा प्रदर्शित झाला आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत बहुतेक ठिकाणी शिवसैनिकांनी ढोलताशांच्या गजरात या सिनेमाचं स्वागत केलं.

Thackeray movie review and release LIVE UPDATES 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील प्रवासावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाचा पहिला शो मुंबईतील वडाळा येथील आयमॅक्स थिएटरमध्ये पहाटे 4.15 वाजता सुरु झाला.

यवतमाळ- ठाकरे सिनेमा पाहायला यवतमाळच्या एलिमेंट्स मॉलमध्ये संगीतकार अवधूत गुप्ते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची हजेरी.

अवधूत गुप्ते – मी यवतमाळमध्ये शिवसैनिकांसोबत शो पहिला. चित्रपट पाहून अतिशय आनंद झाला. बाळासाहेबांचा संघर्ष पाहायला मिळाला.

संजय राठोड यांची प्रतिक्रिया – सच्चा शिवसैनिक म्हणून चित्रपट पाहून आनंद वाटला: संजय राठोड

रत्नागिरीत ठाकरेचा मोफत शो

रत्नागिरीत तीन दिवस ‘ठाकरे’ चित्रपटाचा मोफत शो,शिवसेनकडून मोफत शोचं आयोजन, रत्नागिरीच्या राधाकृष्ण चित्रमंदिरमध्ये रविवारपर्यंत मोफत चित्रपट पाहण्याची संधी, कॉलेजच्या तरुणांसाठी रविवारी शिवसेना दाखवणार ‘ठाकरे’ चित्रपटाचे मोफत शो

नंदुरबारमध्ये बाळासाहेब अवतरले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेला ठाकरे चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला.नंदुरबार शहरातील नंदुरबार बिजनेस सेंटरमधील मिराज चित्रपटगृहात तुफान गर्दी आहे. आजच्या दिवसाचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. ठाकरेंच्या वेशभूषेत एक अवलिया चित्रपटगृहाबाहेर आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. बाळासाहेब ठाकरेंशी मिळता जुळता चेहरा हुबेहूब वेशभूषेत करतोय चित्रपटाचे प्रमोशन

ऐतिहासिक! पहाटे 4.15 वाजताच आयमॅक्समध्ये प्रचंड गर्दीत ‘ठाकरे’चा शो

वसईत ढोलताशांच्या गजरात ठाकरे सिनेमाचं स्वागत 

वसईत शिवसैनिकांनी ढोलताशांच्या गजरात ठाकरे सिनेमाचे स्वागत केले. आजपासून ठाकरे सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ठाकरे सिनेमाची प्रतीक्षा प्रत्येक शिवसैनिक करत होता. वसईच्या कार्निव्हल ड्रिम मॉल या सिनेमागृहात शिवसैनिकांनी पावणे आठचा पहिला शो सुरू केला. शिवसैनिकांनी या पहिल्या शो साठी खास ढोल ताशा पथक आणून, या सिनेमाचं स्वागत केलं. सिनेमागृहाच्या भोवताली संपूर्ण भगव्या झेंड्यांनी भगवमय वातावरण केलं. बाळासाहेबांचे पोस्टर सिनेमागृहाच्या दरवाजाशेजारी लावून, प्रथम तेथे बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलं. प्रत्येक प्रेक्षकाचं स्वागत ढोल ताशाने करण्यात आलं. सिनेमा सुरू होताच आतषबाजीही करण्यात आली.

पुण्यात ठाकरे सिनेमासाठी रांगा

ठाकरे सिनेमाला मोठी गर्दी, पुरुषांसह महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांच्या रांगा. सिनेमा पाहण्यासाठी ढोल ताशा वाजवत शिवसैनिक जथ्थ्यानं हजर. बहुचर्चित ठाकरे सिनेमासाठी उत्सुकता शिगेला, लक्ष्मी रोडवरील विजय टॉकीजला शिवसैनिकांची गर्दी, ढोल ताशा वाजवत स्वागत

नागपुरात गर्दी

नागपुरात शिवसेना कार्यकर्त्यांचा उत्साह, बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमाच्या पहिल्या शोसाठी थिएटरमध्ये गर्दी. थिएटर समोर फटाके फोडत जल्लोष, रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांनी थिएटर बुक केलं.

अक्षय कुमारचं ट्विट

ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमारने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय म्हणतो, “ठाकरे सिनेमाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने माझा मित्र आदित्य ठाकरेला खूप साऱ्या शुभेच्छा. हा सिनेमा त्यांच्या आजोबांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या सामर्थ्याबद्दल आणि त्यांच्या महानतेबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. हेच रुपेरी पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहे”

संबंधित बातम्या :

‘ठाकरे’ वाद : काल पानसे अर्ध्यात निघून गेले, आज सेना-मनसे नेते जुंपले!

‘ठाकरे’चं स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून गेलेल्या दिग्दर्शक पानसेंची पहिली प्रतिक्रिया

‘ठाकरे’च्या स्क्रीनिंगवेळी अपमान, अभिजीत पानसेंच्या समर्थनार्थ मनसेचे तीन नेते मैदानात

ठाकरे सिनेमाची निर्मिती शिवसेनेकडून, पण सारथ्य मनसेकडे!

ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे सिनेमा पहाटे 4 वाजता रिलीज होणार

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.