'ठाकरे' वाद : काल पानसे अर्ध्यात निघून गेले, आज सेना-मनसे नेते जुंपले!

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग झालं. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे स्क्रीनिंग सोडून निघून गेले. त्यानंतर सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाने मोहीम सुरु केली आहे. आता ठाकरे सिनेमाचे निर्माते संजय राऊत आणि मनसेचे …

'ठाकरे' वाद : काल पानसे अर्ध्यात निघून गेले, आज सेना-मनसे नेते जुंपले!

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग झालं. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे स्क्रीनिंग सोडून निघून गेले. त्यानंतर सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाने मोहीम सुरु केली आहे. आता ठाकरे सिनेमाचे निर्माते संजय राऊत आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यात ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी झालेल्या वादावरुन अप्रत्यक्षरित्या दिग्दर्शक अभिजीत पानसेंना टार्गेट करुन ट्वीट केल्यानंतर, त्या ट्विटला संजय राऊत यांचा उल्लेख न करता संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे.

‘ठाकरे’चं स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून गेलेल्या दिग्दर्शक पानसेंची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांनी काय ट्वीट केले आहेत?

“ठाकरे The Biopic… लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणी कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे.”, असे ट्वीट ठाकरे सिनेमाचे निर्माते आणि शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत यांच्या ट्वीटला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले. मात्र, यात संदीप देशपांडे यांनी कुठेच संजय राऊत यांचा उल्लेख केला नाही. मात्र, हे ट्वीट संजय राऊत यांना उद्देशून होते, हे स्पष्ट दिसून येते.

संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “मा. बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिका ला सुद्धा प्रेमाने वागवायचे त्याचा अपमान नाही करायचे हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे जो या चित्रपटाची निर्मिती करण्याऱ्या ना सुद्धा कळला नाही#ISupportAbhjitPanse”

नेमका वाद काय आहे?

‘ठाकरे’ सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग झालं. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं. पण स्वतः दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे कुजबुज पाहायला मिळाली. अभिजित पानसे यांना सर्वात पुढची सीट दिल्यामुळे ते नाराज झाल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही. पानसे कुटुंबासह घरी निघून गेले. अभिजित पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, तर संजय राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

‘ठाकरे’च्या स्क्रीनिंगवेळी अपमान, अभिजीत पानसेंच्या समर्थनार्थ मनसेचे तीन नेते मैदानात

खरं तर अभिजित पानसे हे दिग्दर्शक असण्यासोबतच मनसेचे नेतेही आहेत. मनसे आणि शिवसेनेचा छत्तीसचा आकडा आहे. पण सिनेमासाठी संजय राऊत यांनी अभिजित पानसेंसारख्या अनुभवी आणि कुशल दिग्दर्शकाची निवड केली होती. या सिनेमासाठी मनसेने अभिजित पानसेंना पोस्टरबाजी करत शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर कुठेही संजय राऊत यांचं नाव किंवा फोटो नाही.

अभिजीत, राजसाहेब बरोबर बोलले होते, हे तुला फसवणार : अविनाश जाधव

कोण आहेत अभिजित पानसे?

अभिजित पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये आलेला रेगे हा मराठी सिनेमा प्रचंड गाजला होता. रेगे हे अभिजित पानसे यांचं मोठं यश असल्याचं मानलं जातं. ठाकरे सिनेमासाठीही संजय राऊत यांनी अभिजित पानसे यांची निवड केली. शिवसेनेत असताना भारतीय विद्यर्थी सेनेची धुरा अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर होती. मात्र नंतर आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी युवा सेना स्थापन करण्यात आली आणि विद्यार्थी सेनेचं विलीनीकरण युवासेनेत झालं. मग नाराज पानसे यांनी मनसेच्या इंजिनात बसणं पसंत केलं. सध्या ते राज ठाकरे यांच्यासोबत राजकारणात सक्रीय आहेत.

ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या जवळचे नेते म्हणून ते परिचित आहेत. अगोदर शिवसेनेत असलेले अभिजित पानसे नंतर मनसेत आले होते. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूकही लढली होती.

... म्हणून अभिजित पानसे स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *