ठाकरे सिनेमाची निर्मिती शिवसेनेकडून, पण सारथ्य मनसेकडे!

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलंय. मात्र 25 तारखेला हा सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येईल. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वतः लक्ष घालून हा सिनेमा तयार करुन घेतलाय. संजय राऊत यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे सिनेमात कोणतीही […]

ठाकरे सिनेमाची निर्मिती शिवसेनेकडून, पण सारथ्य मनसेकडे!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलंय. मात्र 25 तारखेला हा सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येईल. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वतः लक्ष घालून हा सिनेमा तयार करुन घेतलाय.

संजय राऊत यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे सिनेमात कोणतीही उणीव राहणार नाही याची काळजी संजय राऊत यांनी घेतलेली आहे. या सिनेमातली विशेष बाब म्हणजे मनसे नेते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. निर्मिती शिवसेनेची असली तरी सिनेमाचं सारथ्य मात्र मनसेकडून करण्यात आल्याचं बोललं जातंय.

मनसे आणि शिवसेना यांच्यातलं नातं नव्याने सांगण्याची गरज नाही. पण सिनेमासाठी राजकीय मतभेद विसरुन एक कलाकार म्हणून अभिजित पानसे यांनी सिनेमाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. मनसेनेही दादरमध्ये पोस्टरबाजी करत फक्त अभिजित पानसे यांना क्रेडिट दिलंय. यामध्ये निर्माते संजय राऊत यांचं कुठेही नाव नव्हतं.

कोण आहेत अभिजित पानसे?

अभिजित पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये आलेला रेगे हा मराठी सिनेमा प्रचंड गाजला होता. रेगे हे अभिजित पानसे यांचं मोठं यश असल्याचं मानलं जातं. ठाकरे सिनेमासाठीही संजय राऊत यांनी अभिजित पानसे यांची निवड केली. वाचाठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या जवळचे नेते म्हणून ते परिचित आहेत. अगोदर शिवसेनेत असलेले अभिजित पानसे नंतर मनसेत आले होते. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूकही लढली होती.

स्पेशल स्क्रीनिंगला पानसे नाराज

मुंबईत सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग झालं. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना पुढच्या रांगेत बसवल्यामुळे पानसे नाराज झाले आणि दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले.

मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. पण स्वतः दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे कुजबुज पाहायला मिळाली. अभिजित पानसे यांना सर्वात पुढचं सीट दिल्यामुळे ते नाराज झाल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.