AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्याचीच ‘हवा’! तलावांच्या शहरातील हवा राज्यात सर्वोत्तम

ठाणेकर सध्या महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध हवा अनुभवत असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आलं आहे.

ठाण्याचीच 'हवा'! तलावांच्या शहरातील हवा राज्यात सर्वोत्तम
| Updated on: Nov 07, 2019 | 9:23 AM
Share

ठाणे : ‘हवा’ करणे हा शब्दप्रयोग सर्वत्र आपलीच चर्चा घडवून आणणे या अर्थाने तरुणाई हल्ली सर्रासपणे वापरताना दिसते. त्याच धर्तीवर हवेच्या बाबती ठाणेकरांची राज्यात ‘हवा’ आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण ठाणेकर सध्या महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध हवा (Thane air quality index) अनुभवत आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

एकीकडे, दिल्लीमध्ये प्रदूषणाने अतिगंभीर पातळीही ओलांडलेली असताना ठाणेकर मात्र मोकळा श्वास घेऊ शकत आहेत. ‘तलावांचं शहर’ अशी ख्याती असलेल्या ठाण्यातील हवा ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम, तर देशातील पाचव्या क्रमाकांची सर्वात शुद्ध हवा आहे. ठाण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक (air quality index) 43 इतका आहे. गेल्या महिन्याभरातील ही आकडेवारी आहे.

ठाण्यानंतर नाशिक, अमरावती यांचा क्रमांक लागतो, तर पुण्याची हवा शुद्धतेच्या बाबतीच चौथ्या क्रमांकावर आहे. ठाण्याची आजूबाजूच्या शहरांची स्थिती मात्र तितकी उत्तम नाही. मुंबईत air quality index 82 आहे, तर नवी मुंबईत 93. दिवाळीच्या आठवड्यात फटाक्यांमुळे ही पातळी खालावल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विशेष म्हणजे भिवंडी शहराने धोक्याची पातळी गाठली आहे. इथला हवा गुणवत्ता निर्देशांक 229 वर घसरला आहे. वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे प्रदूषण वाढल्याची भीती आहे.

50 पेक्षा कमी – उत्तम 50 ते 100 – समाधानकारक 100 ते 200 – अनारोग्यदायी 200 ते 300 – धोकादायक 300 ते 400 – अतिधोकादायक 400 पेक्षा अधिक – भीषण

गेल्या 30 दिवसांची आकडेवारी

महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरं

ठाणे – 43 (उत्तम) नाशिक – 47 (उत्तम) अमरावती – 47 (उत्तम) पुणे – 61 (समाधानकारक) औरंगाबाद – 65 (समाधानकारक) चंद्रपूर – 75 (समाधानकारक) नागपूर – 76 (समाधानकारक) मुंबई – 82 (समाधानकारक) सोलापूर – 88 (समाधानकारक) नवी मुंबई – 93 (समाधानकारक) कल्याण – 99 (समाधानकारक) भिवंडी – 229 (धोकादायक)

अवकाळी पावसामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

देशातील इतर महत्त्वाची शहरं

दुर्गापूर – 21 (सर्वात शुद्ध) एलूर – 24 कोईम्बतूर – 33 शिलाँग – 33 बंगळुरु – 64 हैदराबाद – 76 चेन्नई – 78 कोलकाता – 120 दिल्ली – 271

Thane air quality index

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.