AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus | कोरोना काळात युरोपिय संघ भारताच्या मदतीला धावला

आम्ही भारताला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जारी ठेवणार आहोत, असे युरोपिय संघाने म्हटले आहे. युरोपिय आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जेनेज लेनारकिक यांनी आज यासंदर्भात ट्विट करून भारताला कोरोना संकटात मोठा दिलासा दिला आहे. (The European Union rushed to India's aid, during the Corona period)

Corona Virus | कोरोना काळात युरोपिय संघ भारताच्या मदतीला धावला
| Updated on: Apr 25, 2021 | 10:26 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना विषाणूने अवघ्या जगाची दमछाक केली आहे. गेल्या काही महिन्यांत भारतालाही या विषाणूने प्रचंड हैराण केले आहे. जवळपास सगळेच देश महामारीने त्रासले असल्यामुळे कुणाकडून मदतीची अपेक्षा करायची, असा प्रश्न भारतापुढेही आहे. मात्र या संकटाच्या काळात युरोपिय संघाने भारताला खंबीर साथ देत सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दाखवली आहे. आम्ही भारताला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जारी ठेवणार आहोत, असे युरोपिय संघाने म्हटले आहे. युरोपिय आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जेनेज लेनारकिक यांनी आज यासंदर्भात ट्विट करून भारताला कोरोना संकटात मोठा दिलासा दिला आहे. (The European Union rushed to India’s aid, during the Corona period)

ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेसाठी मदतीला सुरुवात

भारतात सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे नोंद झाली आहे. ही आकडेवारी सरकार आणि आरोग्य यंत्रणेसह सर्वसामान्य जनतेमध्ये धडकी भरवणारी आहे. याचदरम्यान युरोपिय संघाने भारताला मदतीचा शब्द दिला आहे. किंबहुना, युरोपिय संघाने ऑक्सिजन आणि कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधांच्या उपलब्धतेसाठी प्रत्यक्ष कृतीही सुरू केली आहे. भारताने मदतीबाबत केलेल्या विनंतीला अनुसरून युरोपियन संघाने ईयु सिव्हील प्रोटेक्शन मॅकेनिझम सक्रीय केली आहे. युरोपिय संघ भारताच्या मदतीसाठी आवश्यक ती सामग्री गतीने जमा करणार आहे, असे युरोपिय आयुक्त लेनारकिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, युरोप मदतीच्या हेतूने मार्च महिन्यापासूनच भारतातील कोरोनाच्या रुग्णवाढीवर लक्ष ठेवून आहे. युरोपिय संघ हा 27 देशांचा शक्तीशाली समूह आहे.

जर्मनी आणि इस्त्राईलही शक्य ती मदत करणार

भारतात सध्याच्या घडीला कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे देशाची चिंता भलतीच वाढली आहे. दररोज जवळपास तीन ते साडेतीन लाखांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णसंखया भलतीच वाढून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. अशा चिंतेच्या परिस्थितीत जर्मनी आणि इस्त्राईल हे आणखी दोन देशही मदतीसाठी पुढे सरसावले आहे. या दोन्ही देशांनी भारताला शक्य ती सर्व मदत करणार असल्याची हमी दिली आहे. जर्मनीने भारताला एक सचल ऑक्सिजन जनरेटर व अन्य प्रकारची मदत पुरवण्याचा विचार केला आहे. जर्मनीच्या संरक्षण मंत्रालयाने आज या मदतीबाबत घोषणा केली. जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकांबाबत याआधीच सहानुभूती व्यक्त केली होती. जर्मनीच्या सैन्याने कोरोना महामारीदरम्यान इतर देश व आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीसाठी आतापर्यंत 38 मदत अभियान राबवले आहेत. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडवला आहे. मृत्यूदर अचानक वाढल्यामुळे देशात प्रचंड भितीचे वातावरण आहे. (The European Union rushed to India’s aid, during the Corona period)

इतर बातम्या

देशात अवघ्या 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज, एम्सच्या संचालकांचा दावा

इराकमध्ये हाहा:कार ! ऑक्सिजनचा सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट, 82 जणांचा होरपळून मृत्यू, 100 पेक्षा जास्त जखमी

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...