1 किलोचं वजन बदलणार, लवकरच नवं वजन बाजारात!

पॅरिस (फ्रान्स) : किलोग्रॅम म्हणजे काय, एका किलो ग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात, हे सर्व तर आपण शाळेत शिकलो. पण अमूक ग्रॅम म्हणजे 1 किलो हे परिणाम ठरलं कसं? 1 किलोचा शोध लागला कसा? तराजूत एका बाजूला 1 किलोचं वजन आणि दुसऱ्या बाजूला वस्तू वजन करताना, काटा समान आहे की, नाही हे आपण पाहतो. मात्र 1 किलोचं वजनच जर अचूक नसेल तर? […]

1 किलोचं वजन बदलणार, लवकरच नवं वजन बाजारात!
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 5:02 PM

पॅरिस (फ्रान्स) : किलोग्रॅम म्हणजे काय, एका किलो ग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात, हे सर्व तर आपण शाळेत शिकलो. पण अमूक ग्रॅम म्हणजे 1 किलो हे परिणाम ठरलं कसं? 1 किलोचा शोध लागला कसा? तराजूत एका बाजूला 1 किलोचं वजन आणि दुसऱ्या बाजूला वस्तू वजन करताना, काटा समान आहे की, नाही हे आपण पाहतो. मात्र 1 किलोचं वजनच जर अचूक नसेल तर?

कित्येक वर्षांपासून ज्या किलोग्रॅमवर आपण विश्वास ठेऊन आहे, ते खरंतर अॅक्युरेट म्हणजेच अचूक नाही.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी ‘वेट अँड मेजर्स’ या विषयावर एक भव्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक वैज्ञानिकांनी सहभाग घेतला. इथे किलोग्रॅमच्या मानकला बदलण्यावर वैज्ञानिकांचे मत घेण्यात आले. यामध्ये जास्तीत जास्त वैज्ञानिकांनी हे मानक बदलायला हवं, असं मत नोंदवले. त्यानंतर मानक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपण सध्या जो किलोग्रॅम म्हणून वापरतो, त्याचं मानक पॅरिस येथे एका भांड्यात आहे. पॅरिस येथील फ्रंटियर सवोयमधील इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स (बीआयपीएम) येथील व्हॉल्टमध्ये 90 टक्के प्लॅटिनम आणि 10 टक्के इरिडिअम असलेला 4 सेंटीमीटरचा एक सिलेंडर आहे, याला Le Grand K म्हणून ओळखलं जातं. हे 1889 मध्ये लंडन येथे तयार करण्यात आलं होतं. याला जगभर International Prototype Kilogram (IPK) म्हणून ओळखले जाते. संपूर्ण जगात यावरुन किलोग्रॅमचं वजन ठरवण्यात आलं.

या IPK च्या 40 अधिकृत प्रति बनविण्यात आल्या. यापैकी एक भारताकडेही आहे, जी दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबमध्ये ठेवण्यात आली आहे. याला नं.  57 म्हटले जाते. देशात यावरुनच किलोग्रॅमचं वजन ठरलं.

दर 30-40 वर्षांनंतर IPK वर जमणारी धूळ साफ केली जाते. या दरम्यान, मापकाचं वजन काही अंशी कमी होते. वैज्ञनिकांच्या मते, मागील 100 वर्षांत याचं वजन 50 मायक्रोग्रॅमने कमी झालं. म्हणून वैज्ञनिकांना हे मापक बदलून त्याच्याजागी एक स्थिर मापक आणायचे होते. याने सामान्य माणसाच्या जीवनात फरक पडत नसला, तरी औषधी तसेच इतर केमिकलवर होणाऱ्या शोधांवर याचा परिणाम दिसून येतो.

वैज्ञानिक याने Planck’s Constant चा सिद्धांत मोजण्याच्या तयारीत आहेत, जिथे एखाद्या वस्तूचं स्थिर वजन मापलं जाऊ शकतं. याकरिता वैज्ञानिक  Kibble Balance चा वापर करतील, जे Planck’s Constant च्या सिद्धांतावर काम करतो.

जो बदल झाला आहे, त्याने दैनंदिन जीवनावर काहीही परिणाम होणार नाही. पण, उद्योग आणि विज्ञान जगात याचा व्यावहारिक वापर होईल, कारण इथे अचूक मापनाची गरज असते. सामान्य जीवनात याप्रकारच्या सूक्ष्म बदलांनी काहीही फरक पडत नाही, पण अचूक वैज्ञानिक गणनेसाठी हे आवश्यक असतं

भविष्यात किलोग्रॅमला किब्बल किंवा वॅट बॅलेन्सने मोजले जाईल. ज्यामुळे किलोग्रॅमची परिभाषा बदलणार नाही. नवा किलोग्रॅम 2019 पर्यंत येऊ शकतो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें