रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी 26 वर्षांनी मिळाली, मुंबई सेंट्रल पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेली तर ती परत मिळेल याची शक्यता खूप कमी असते (Stolen Gold Chain got after many years Vasai).

रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी 26 वर्षांनी मिळाली, मुंबई सेंट्रल पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 12:21 AM

वसई : एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेली तर ती परत मिळेल याची शक्यता खूप कमी असते (Stolen Gold Chain got after many years Vasai). पण वसईतील एका महिलेला तब्बल 26 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली सोनसाखळी परत मिळालेली आहे. पिंकी डीकुना असं या महिलेचे नाव आहे. ही सोनसाखळी परत 26 वर्षांनी मिळाल्याने त्यांनाही धक्का बसला आहे (Stolen Gold Chain got after many years Vasai).

पिंकी डीकुना या 26 वर्षापूर्वी म्हणजेच 1994 ला मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत होत्या. यावेळी ट्रेनच्या गर्दीत त्यांची सोनसाखळी चोरीला गेली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. त्यानंतर 26 वर्षांनी पोलिसांनी आरोपी मोहम्मद निजाम नासिरला अटक केली. त्यामुळे एवढ्या वर्षांनी चोरीला गेलेली सोनसाखळी परत मिळाली.

ही सोनसाखळी पोलिसांनी पिंकी डीकुना यांच्या घरी जाऊन त्यांना दिली. यावेळी पिंकी यांना आनंद झाला पण धक्काही बसला. कारण या महिलेने विचार केला नसेल की, 26 वर्षापूर्वी चोरीला गेलेली सोनसाखळी परत मिळेल.

पिंकी डिकूना या 1994 ला कामानिमित्त चर्चगेटला आल्या होत्या. यावेळी प्रवासात त्यांची सोनसाखळी चोरीला गेली होती. एकूण सात ग्रॅमची ही सोनसाखळी आहे.

संबंधित बातम्या :

शेजाऱ्यांचं पाहून दोन भावांचा खारी विक्रीचा धंदा, मात्र व्यावसायिक वादातून एकाची निघृण हत्या

तुझ्या वागणुकीत सुधारणा कर, वडिलांच्या प्रश्नाने मुलीचा संताप, उकळतं तेल वडिलांवर ओतलं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.