हत्या करुन शौचालयाच्या टाकीत शरिराचे तुकडे टाकले!

हत्या करुन शौचालयाच्या टाकीत शरिराचे तुकडे टाकले!

विरार : विरारमध्ये 58 वर्षीय गणेश कोळेकर व्यक्तीची हत्या करण्यात आली. ही हत्या आर्थिक व्यवहारातून झाली असल्याचं सागण्यात येत आहे. हत्या करुन आरोपीने शरिराचे तुकडे शौचालयाच्या टाकीमध्ये टाकल्याचे समोर आलं आहे. चेंबर चॉकप झाल्याने आणि परिसरात दुर्गंधी पसरल्याने चेंबर साफ केले असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. यामध्ये हाताची बोटं सापडली असून, एका बोटात रिंग मिळाली आहे. पिंटू भाई असं आरोपीच नाव असून अर्नाळा सागरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही घटना विरार पश्चिम ग्लोबल सिटी परिसरातील बचराज पॅराडाईज या हायप्रोफाईल इमारतीमधील आहे. या इमारतीच्या सी विंगच्या शौचालयाच्या चेंबरमध्ये शुक्रावारपासून दुर्गंधी सुरू झाली होती. तसेच चेंबरही जाम झाले होते. आज चेंबरची साफसफाई केल्याने त्यातून चक्क मानवी शरिराचे तुकडे असल्याचे दिसले. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी ते तुकडे सोसायटीपासून काही अंतरावर असलेल्या एका गटारात फेकून दिले. मात्र तिथे हाताचे बोट मिळाले आणि त्या बोटात रिंग आढळली आहे. त्यावरून हे शरिर महिलेचे असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

सोसायटी सभासदांना सुरुवातीला याचे गांभीर्य वाटले नाही. त्यानंतर हाताचे बोट सापडले आणि एकच खळबळ माजली. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन  शरिराचे तुकडे एकत्र करून, ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले आहेत. कुठे काही सुगावा मिळतो का यासाठी इमारतीमधील सर्व बंद घर पोलिसांनी तपासले आहेत. पण पोलिसांना फक्त शरिराचे तुकडे मिळाले आहेत. इमारतीचा सीसीटीव्हीही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ज्या ठिकाणी शरिराचे तुकडे टाकले आहेत, त्या गटारात पूर्ण शरिराचे छोटे-मोठे शरिराचे तुकडे मिळालेले आहेत. पोलिसांनी 35 ते 40 किलोचे शरिराचे तुकडे गोळा केले आहेत. हे शरिराचे तुकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर फरार आरोपी पिंटू भाईचा पोलीस शोध घेत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI