राजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, ICU बेडसाठी ‘आप’ सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

| Updated on: Nov 04, 2020 | 12:40 PM

देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची तिसली लाट आल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी दिली आहे. खासगी रुग्णालयातील राखील ICU बेडसाठी केजरीवाल सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहितीही सतेंद्र जैन यांनी दिली आहे.

राजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, ICU बेडसाठी आप सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!
Follow us on

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी सांगितलं आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 6 हजार 725 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनारुग्णांची एकूण संख्या 4 लाख 3 हजार 96 वर जाऊन पोहोचली आहे. यापूर्वी 30 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये 5 हजार 891 नवे रुग्ण आढळून आले होते. (The third wave of corona in Delhi, the AAP government will go to the Supreme Court for ICU beds)

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आल्याचं आपण म्हणू शकतो. मात्र, दिल्ली सरकार गेल्या 15 दिवसांपासून खास नियोजनानुसार काम करत असल्याचं सतेंद्र जैन यांनी सांगितलं. अॅग्रेसिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर दिल्ली सरकारचा भर आहे. कुणीही व्यक्ती कोरोना पॉझिट्वि आल्यास त्याच्या संपर्कातील सर्वांचीच चाचणी करत आहोत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचं जैन म्हणाले.

खासगी रुग्णालयात 80 टक्के ICU बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र त्यावर उच्च न्यायालयानं स्थगिती आणली त्यामुळे केजरीवाल सरकार आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.

मध्यमवर्गात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला!

दिल्लीमध्ये सुरुवातीला गरीब वस्तीमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. तो आता मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या रहिवासी भागात वाढला असल्याची माहितीही जैन यांनी दिली. अशावेळी हे रुग्ण खासगी दवाखान्यात जाणे पसंत करत आहेत. त्याचबरोबर आरोग्य विमा असणाऱ्या रुग्णांची संख्याही खासगी दवाखान्यात वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात ICU बेड्सची संख्या कमी पडत असल्याचं जैन म्हणाले.

महाराष्ट्र सरकार सज्ज- राजेश टोपे

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. दुसऱ्या लाटेची शक्यता असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे, असा दावा आरोग्यमंत्रई राजेश टोपे यांनी केला आहे.  “सध्या युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. या संदर्भातल्या बातम्या आपण ऐकतो आहोत. साहजिकच आपल्याकडे देखील कोरोनाची दुसरी लाट येईल का अशी चर्चा सुरु आहे. मात्र आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी, राज्य सरकार तरीही सज्ज : आरोग्यमंत्री टोपे

राजस्थानात फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीवर बंदी!, कोरोना आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा निर्णय

‘भारत बायोटेक’ची कोरोना प्रतिबंधक लस 2021च्या मार्चनंतर येण्याची शक्यता, काय असेल किंमत?

The third wave of corona in Delhi, the AAP government will go to the Supreme Court for ICU beds