‘भारत बायोटेक’ची कोरोना प्रतिबंधक लस 2021च्या मार्चनंतर येण्याची शक्यता, काय असेल किंमत?

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. देशातील वेगवेगळ्या शहरात ही चाचणी सुरु असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत बायोटेक कंपनीची कोरोना प्रतिबंधक लसही पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे.

'भारत बायोटेक'ची कोरोना प्रतिबंधक लस 2021च्या मार्चनंतर येण्याची शक्यता, काय असेल किंमत?
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 8:13 AM

नवी दिल्ली: भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health  ministry) दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या 80 लाख पार गेली आहे. तर दुसरीकडे भारतासह जगभरात कोरोनावर लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीची कोरोना प्रतिबंधक लसही (Corona Vaccine) पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी औषधे नियामक मंडळाकडून आवश्यक परवानग्यांची गरज आहे.(Bharat Biotech’s corona vaccine expected after March 2021)

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. देशातील वेगवेगळ्या शहरात ही चाचणी सुरु असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी दिली आहे. त्यासाठी कंपनीने जवळपास 350 – 400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यासाठी काही नवीन प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. सरकारी आणि खासगी बाजारपेठांनाही कोरोनाची लस पुरवण्याचं भारत बायोटेकचा विचार आहे. भारत बायोटेकने कोरोना लसीची किंमत अद्याप ठरवलेली नाही. कारण, कंपनी सध्या फक्त लसीच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.

भारतातील कोरोना रुग्णांची स्थिती

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 80 लाख 88 हजार 851 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 5 लाथ 94 हजार 386 अॅक्टिव रुग्ण आहेत. तर 73 लाख 73 हजार 375 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 17 हजार 306 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगभरातील कोरोनाची आकडेवारी

तर जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4 कोटी 54 लाख 75 हजार 639 वर जाऊन पोहोचला आहे. तर जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 11 लाख 87 हजार 014 जणांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्स-जर्मनीपाठोपाठ इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन

कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील (Europe) देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जर्मनीमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 40 वाढ झाल्यामुळे 2 नोव्हेंबरपासून लाॉकडाऊनची (lockdown) कडकपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. स्पेनमध्येही यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या देशांपाठोपाठ आता इंग्लंडमध्येदेखील पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने WHO चे प्रमुख होम क्वारन्टाईन

ट्रम्प यांच्या 18 रॅलीतील 30 हजाराहून अधिक सहभागींना कोरोना, 700 जणांचा मृत्यू : अहवाल

मुंबईत कोरोनाच्या लसीच्या वितरणाची जोरदार तयारी, आरोग्य सेवकांना प्रथम प्राधान्य

Bharat Biotech’s corona vaccine expected after March 2021

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.