मुंबईत कोरोनाच्या लसीच्या वितरणाची जोरदार तयारी, आरोग्य सेवकांना प्रथम प्राधान्य

कोरोना लस आल्यानंतर ती सर्वप्रथम आरोग्य सेवकांना दिली जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. (Mumbai  health workers get priority in Corona Vaccine)  

मुंबईत कोरोनाच्या लसीच्या वितरणाची जोरदार तयारी, आरोग्य सेवकांना प्रथम प्राधान्य
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 9:03 AM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात लाखो लोकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगभरातील सर्वच लोक कोरोना लसीकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. कोरोनावरील लसींचे संशोधन विविध देशांमध्ये केले जात आहे. तर दुसरीकडे मुंबईत कोरोनाच्या लसीच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु आहे. कोरोना लस आल्यानंतर ती सर्वप्रथम आरोग्य सेवकांना दिली जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. (Mumbai  health workers get priority in Corona Vaccine)

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तब्बल सात महिने कोरोनाशी लढा दिल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत आहे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्तरावर पीछेहाट करणाऱ्या कोरोनाला मात देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. कोरोना लस आल्यावर मुंबईत पहिल्यांदा आरोग्य सेवकांना ही लस दिली जाणार आहे.

जगभरात अनेक ठिकाणी कोरोना लसीवर संशोधन केले जात आहे. या संकटाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लवकरच लसही उपलब्ध होणार आहे. मुंबईतील नायर आणि केईएम रुग्णालयांत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. ही लस आतापर्यंत 163 स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील कोणत्याही स्वयंसेवकांना याचे दुष्परिणाम जाणवलेले नाहीत.

दरम्यान ही लस सर्वप्रथम वैद्यकीय कर्मचारी, कोविड लढ्यात प्रत्यक्ष सहभागी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागनिहाय माहिती घेऊन आरोग्य शिबीर आयोजित केले जातील. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

तसेच ही लस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी दवाखाने, आरोग्य केंद्र यांचे सहकार्य घेणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

सर्वप्रथम लस कोणाला मिळणार?

शासकीय कर्मचारी : परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

खासगी कर्मचारी : रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत. (Mumbai  health workers get priority in Corona Vaccine)

संबंधित बातम्या : 

आता पालिकेच्या दवाखान्यातही कोरोनाची चाचणी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; रुग्णांना दिलासा

मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, तब्बल 10 दिवसात दीडशे पार

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.