कोरोनाचा फटका, IPL पुढे ढकलण्याचा विचार : आरोग्य मंत्री राजेश टोपे

जगभरात गाजलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला कोरोनाचा (Threat to IPL due to coronavirus ) फटका बसण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा फटका, IPL पुढे ढकलण्याचा विचार : आरोग्य मंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Mar 07, 2020 | 12:08 PM

नागपूर : कोरोना विषाणूचा फटका कला, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांना बसला असताना, आता क्रीडा क्षेत्रही त्यातून सुटलेलं नाही. जगभरात गाजलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला कोरोनाचा (Threat to IPL due to coronavirus ) फटका बसण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी, आयपीएल पुढे (Threat to IPL due to coronavirus)  ढकलण्याचे संकेत दिले आहेत. ते नागपुरात बोलत होते. काही दिवसांनी IPL स्पर्धा सुरु होत आहे. मात्र या कोरोनाच्या भीतीमुळ ही स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भात विचार सुरू आहे, यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असं राजेश टोपे म्हणाले.

नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशी विमानातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सर्व शासकीय रुग्णालयात कोरोनासंदर्भात वॉर्ड आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

कोरोना व्हायरस संदर्भात आशा वर्कर्सना 11 ते 13 मार्च दरम्यान ट्रेनिंग दिलं जाणार आहे. घाबरुन जाण्याची गरज नाही, मास्कची गरज नाही, त्यामुळं मास्कची साठवणूक करू नका, असं आवाहन राजेश टोपेंनी केलं.

कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. शाळा बंद करा, काही शासकीय कार्यालयात बायोमेट्रोक पद्धती बंद करण्यात आली आहे, हे चुकीचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, आता होळी आहे, मात्र गर्दी न करता छोट्या प्रमाणात होळी साजरी करा, असंही आवाहन टोपेंनी केलं.

29 मार्चपासून आयपीएल

दरम्यान आयपीएल 2020 ला 29 मार्चपासून सुरुवात होणारआहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीची लढत होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्याआधी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन डे मालिका आहे. 12 मार्च, 15 मार्च आणि 18 मार्च असे तीन वन डे सामने होणार आहेत. त्यानंतर 11 दिवसांनी म्हणजे 29 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. अंतिम सामना 24 मे रोजी खेळवण्यात येईल. म्हणजे जवळपास 2 महिने आयपीएल रंगणार आहे.

कोरोनाचा फटका

एकीकडे आयपीएलचं वेळापत्रक आधीच जाहीर झालं असलं, तरी जगभर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने, आयपीएलचं वेळापत्रक पुढे ढकललं जाऊ शकतं. तसे संकेतच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या 

Hardik Pandya | झंझावात, वादळ, धमाका, हार्दिक पंड्याची तुफानी खेळी, 55 चेंडूत 20 षटकार

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.