AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायडेन यांच्या प्रचार अभियानाशी संबंधित 3 जणांना कोरोना, कमला हॅरिस ऑनलाईन प्रचार करणार

डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या टीममधील 3 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. प्रचाराच्या टीममधील 3 जणांना कोरोना झाल्यानं उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना त्यांचे कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत.

बायडेन यांच्या प्रचार अभियानाशी संबंधित 3 जणांना कोरोना, कमला हॅरिस ऑनलाईन प्रचार करणार
| Updated on: Oct 16, 2020 | 4:51 PM
Share

नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या प्रचार अभियानाशी संबंधित असलेल्या  3 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.  3 जणांना कोरोना झाल्यानं उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना त्यांचे कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. कमला हॅरिस यांनी ऑनलाईन पद्धतीने प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जो बायडेन यांनी त्यांच्या नियोजनात बदल केलेला नाही. ( Three person found corona positive in Joe Biden and Kamala Haris campaign team)

बायडेन यांच्या प्रचार अभियानातील  दोन जणांना कोरोना झाल्याचे गुरूवारी सकाळी तर दुपारी एकाला स्पष्ट झाले होते. यामध्ये हॅरिस यांच्याशी संबंधित लिज एलन आणि इतर दोघांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोना झालेला एक व्यक्ती विमान वाहतूक कंपनीचा कर्मचारी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला बायडेन यांच्या ओहायो आणि फ्लोरिडा येथील दौऱ्यावेळी व्यक्ती विमानात उपस्थित होती. विमान वाहतूक कंपनीचा कर्मचारी हा विमानामध्ये मागील बाजूने प्रवेश करुन बसला होता. तो आणि जो बायडेन यांच्यात अंतर होते, असे बायडेन यांच्या प्रचार अभियानाच्या वतीनं सांगण्यात आले.

दरम्यान, बायडेन गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संदर्भात सुरक्षेच्या उपायांचे पालन करत आहेत. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांची खिल्ली उडवली होती. उत्तर कैरोलाइनामध्ये प्रचार करताना ट्रम्प यांनी डेमोक्रेट पक्षाच्या जो बायडेन आणि कमला हरिस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता.

संबंधित बातम्या : 

Donald Trump | ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अकाऊंट ब्लॉक

Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांच्या डान्सचा व्हिडीओ वायरल, आपण पाहिला का?

( Three person found corona positive in Joe Biden and Kamala Haris campaign team)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.