AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Heart Day : हृदयाची निगा राखण्यासाठी 5 टिप्स

हृदयविकारच्या झटक्याने आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून याचे प्रमुख कारण बदलती जीवनशैली आहे. जर तुम्ही हृदयाला निरोगी ठेवायचे असेल, तर या पाच टिप्सचा नक्की (Tips prevent heart attack) वापर करावा.

World Heart Day :  हृदयाची निगा राखण्यासाठी 5 टिप्स
| Updated on: Sep 29, 2019 | 1:17 PM
Share

मुंबई : हृदय हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव. गेल्या काही वर्षांपासून तरुण पिढीमध्ये हृदयासंबंधीचे आजारात वाढ (Tips prevent heart attack) झाली आहे. हृदयविकारच्या झटक्याने आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून याचे प्रमुख कारण बदलती जीवनशैली आहे. सद्यस्थितीत तरुण पिढी व्यायाम, योगा या गोष्टी करण्यास टाळाटाळ करते आणि जंक फूडला (Tips prevent heart attack) जवळ करते. जर तुम्ही हृदयाला निरोगी ठेवायचे असेल, तर या पाच टिप्सचा नक्की (Tips prevent heart attack) वापर करावा.

हृदयाची निगा राखण्यासाठी 5 उपाय – (Tips prevent heart attack)

दररोज व्यायाम करा

हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे व्यायाम. दररोज व्यायाम केल्याने हृदयासंबंधीच्या आजार कमी होतात. त्यामुळे दररोज किमान 15 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. जर व्यायाम करणं शक्य नसेल, तर दररोज काही वेळ चाला. चालल्याने तुमचे हृदय निरोगी राहते.

तेलकट खाणे टाळा

जंक फूडमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हृदयाला धोका निर्माण होता. जर तुम्हाला हृदयाच्या आजारापासून दूर राहायचे असेल, तर तेलकट खाणे टाळा,

ताण-तणावापासून चार हात लांब राहा

तणाव हे हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण आहे. स्वत:ला तणावापासून दूर राहण्यासाठी मेडिटेशन करावे. मेडिटेशन केल्याने मनाला शांती मिळते. त्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याचे धोका कमी होतो.

रक्तादाबावर नियंत्रण

जर तुम्हाला हृदयाच्या आजारापासून दूर राहायचे असेल, तर रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. उच्च रक्तदाब असणाऱ्यांना हृदयासंबंधीचे आजार होण्याचा धोका जास्त असतो.

मासे खा

मांसाहारी पदार्थात ओमेगा 3 हे फॅटी अॅसिड असते. चिकन किंवा अंडी खाण्यापेक्षा मासे खावे. त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. यामुळे डोळ्यांची निगा राखली जात असून हृदयालाही याचा फायदा होतो. दर आठवड्याला एकदा मासे खाल्ल्याने हार्ट अॅटकचा धोका कमी होतो.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...