वाघा बॉर्डरवरुन आज भारताचा ढाण्या वाघ परतणार

वाघा बॉर्डरवरुन आज भारताचा ढाण्या वाघ परतणार

नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज पाकिस्तानातून भारतात परतणार आहेत. अभिनंदन हे सध्या पाकिस्तानातील भारतीय दूतावासात आहेत. कालच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली जाईल, अशी पाक संसदेत घोषणा केली. त्यानंतर अभिनंदन यांना तातडीने इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासात नेण्यात आले. पंजाबमधील वाघा बॉर्डवरुन विंग कमांडर […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज पाकिस्तानातून भारतात परतणार आहेत. अभिनंदन हे सध्या पाकिस्तानातील भारतीय दूतावासात आहेत. कालच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली जाईल, अशी पाक संसदेत घोषणा केली. त्यानंतर अभिनंदन यांना तातडीने इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासात नेण्यात आले. पंजाबमधील वाघा बॉर्डवरुन विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परततील. दुपारपर्यंत अभिनंदन हे मायदेशी येतील.

इम्रान खान काय म्हणाले?

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तातडीने सोडण्यात यावं, अन्यथा तुमची खैर नाही, असा थेट इशारा भारताना पाकिस्तानला दिला होता. त्यानंतर, शांततेसाठी सदिच्छा म्हणून अभिनंदन यांची सुटका करत आहोत, असे म्हणत इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत सुटकेची घोषणा केली. तसेच, भारतीय पायलटची सुटका म्हणजे आमचा दुबळेपणा समजू नये, असेही इम्रान खान म्हणाले.

पाकची मजबुरी की नवा डाव? इम्रान खानची 7 विधाने काय दर्शवतात?

भारताने काय इशारा दिला होता?

“भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना लगेच परत येण्याची अपेक्षा आहे. कोणत्याही व्यवहाराचा कोणताही प्रश्न नाही. जर पाकिस्तानला असे वाटते की त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी अभिनंदनचा वापर होईल, तर ते चुकीचे आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना मानवी पद्धतीने वागवावे अशी भारताची अपेक्षा.”, असा थेट इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता.

पायलटच्या सुटकेसाठी अटी-बिटी काही मानणार नाही, असेही भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले होते.

कोण आहेत अभिनंदन वर्धमान?

अभिनंदन हे भारतीय वायूसेनेत विंग कमांडर आहेत. बुधवारी ते मिग 21 हे विमान घेऊन उड्डाण घेतलं, पण पाकिस्तानने हे विमान पाडलं. अभिनंदन यांनी स्वतःची सुटका तर केली, पण ते खाली पडलेल्या अवस्थेत असताना त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली. स्थानिकांकडून अभिनंदन यांना मारहाणही करण्यात आली.

पाकिस्तानने सकाळी जो व्हिडीओ रिलाज केला, त्यात अभिनंदन यांच्या चेहऱ्यावर रक्त दिसत होतं. पण दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते चहा पिताना दिसत आहेत. शिवाय मी सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अभिनंदन आपण दक्षिण भारतीय असल्याचं सांगत आहेत. शिवाय लग्न झालेलं आहे का असं विचारल्यानंतर त्यांनी हो उत्तर दिलं.

अभिनंदन यांना देशसेवेचं बाळकडू घरातून मिळालंय. त्यांचे वडीलही भारतीय वायूसेनेतच होते. अभिनंदन हे 2004 मध्ये वायूसेनेत दाखल झाले. अभिनंदन यांना अटक केल्याची माहिती समोर येताच भारतात त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. सोशल मीडियावर अभिनंदन यांना परत आणा म्हणून मोहिम राबवण्यात आली.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें