आधी बदलीविरोधात आत्महत्येचा इशारा, मग वाहतूक पोलीस बेशुद्धावस्थेत, साताऱ्यात खळबळ

आधी बदलीविरोधात आत्महत्येचा इशारा, मग वाहतूक पोलीस बेशुद्धावस्थेत, साताऱ्यात खळबळ
विजय माळी

सातारा : घरातून बेपत्ता असलेले सातारा पोलीस (Satara Police) दलातील वाहतूक शाखेचे चालक विजय माळी (Vijay Mali) हे यवतेश्वर इथे बेशुद्धावस्थेत आढळून आले आहेत. त्यांच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माळी यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात बदली केल्याने आत्महत्या करत जीवन संपवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विजय माळी हे घरातून बेपत्ता होते. शोधाशोध केल्यानंतर माळी हे यवतेश्वर इथे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना पचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Traffic Police driver found unconscious in Yavateshwar in Satara posted a video on social media warning of suicide)

सोशल मीडियावर आत्महत्येचा इशारा

विजय माळी हे सातारा वाहतूक पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी सातारा पोलीस दलातील 300 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये माळी यांचंही नाव होतं. त्यांची बदली म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, घरगुती कारण देत माळी यांनी म्हसवडला जाण्यास नकार दिला. याबाबत त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंतीही केली. मात्र, ती अमान्य करण्यात आली. त्यामुळे नैराश्येत गेलेल्या माळी यांनी सोशल मीडियावरून जीवन संपवत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता.

चुकीच्या पद्धतीने बदल्या झाल्याच्या चर्चा

विजय माळी हे बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर सातारा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. विजय माळी यांनी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर पोलीस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत. सातारा पोलीस दलातल्या बदल्या चुकीच्या पद्धतीने झाल्याचं बोललं जात आहे. विजय माळी यांच्यासोबत सातारा पोलीस दलातल्या 300 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (traffic police driver found unconscious in Yavateshwar in satara posted a video on social media warning of suicide)

 

इतर बातम्या :

‘पोलिसांनी मला सोडण्यासाठी 10 हजार घेतले, मारहाण करणारी तरुणी पोलिसांची खबरी’, कॅब ड्रायव्हरचा गंभीर आरोप

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI