AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dil Bechara Review : हॉलिवूड शोकांतिकेची सामान्य आवृत्ती ‘दिल बेचारा’

'एक था राजा एक थी रानी दोनो मर गए खत्म कहानी' हा संवाद आहे 'दिल बेचारा' सिनेमातला आणि महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाची गोष्ट या एका संवादातून आपल्याला कळते(Movie review of Dil Bechara).

Dil Bechara Review : हॉलिवूड शोकांतिकेची सामान्य आवृत्ती 'दिल बेचारा'
| Edited By: | Updated on: Jul 25, 2020 | 3:29 PM
Share

‘एक था राजा एक थी रानी दोनो मर गए खत्म कहानी’ हा संवाद आहे ‘दिल बेचारा’ सिनेमातला आणि महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाची गोष्ट या एका संवादातून आपल्याला कळते(Movie review of Dil Bechara). ‘जनम कब लेना है और मरना कब है ये हम डिसाईड नही कर सकते’, हा संवाद जेव्हा म्हणतो तेव्हा विश्वासच बसत नाही की तो आज आपल्यात नाही. बघायला गेलं तर तो आपला कोणीच लागतं नाही, त्याने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचा आपल्याला गंधसुद्धा नाही आणि या मागचं रहस्य कधी बाहेरसुद्धा येणार नाही. पण एखाद्याचं फक्त आपल्यात असणं हे सिनेमासारख्या ऑडीओ-व्हिज्यूअल माध्यमातून आपल्या मनावर कायमचं कोरलं जातं, तसं काहीसं दिल बेचारा बघतांना होतं (Movie review of Dil Bechara).

सुशांतनं रंगवलेला धोनी मला प्रचंड आवडला होता. छिछोरेमध्येही त्यानं उत्तम काम केलं होतं. पण तरीही मी काही त्याचा फॅन नाही. त्याचा सिनेमा बघण्याची इतकी एक्साईटमेन्टही कधी झाली नव्हती. आज दिल बेचारा बघण्यासाठी मात्र ‘दिल’ बैचेन झाला होता. चित्रपटाच्या बाबतीत सर्वात महत्वाचं काय असेल तर तो प्रदर्शित होण्याची वेळ ! सुशांत सिंगचा अकस्मात झालेला मृत्यू आणि लॉकडाउनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहण्याची मिळालेली संधी, यामुळे या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे. तो गेल्यापासून या सिनेमाला त्याची शेटवची आठवण म्हणून प्रमोट केलं गेलं आहे. आता हा सगळा मार्केटिंगचा फंडा आहे हे वेगळं सांगायला नको.

‘द फॉल्ट इन आवर स्टार्स या हॉलिवूड शोकांतिकेची एक सामान्य आवृत्ती असलेला हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित झालाय. मैनी (सुशांत सिंग राजपूत ) आणि किझी (संजना संघवी) या दोघांनाही कॅन्सर आहे आणि त्यांना उरलेलं आयुष्य हे सुखात आणि एकमेकांच्या सहवासात घालवायचं आहे. एकमेकांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. मृत्यू कधीही येऊ शकतो याची जाणिव असून सुध्दा मस्तमौला आयुष्य या दोघांना जगायचं. एकमेकांच्या सुख-दुखात साथ द्यायचीये. मैनी आणि किझी एकमेकांना कसे भेटतात ? त्यांची स्वप्न काय असतात ? ति ते पूर्ण करतात का ? खडतरप्रसंगी पण आयुष्याचा आनंद ते कसा घेतात? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ‘दिल बेचारा’ बघितल्यावर मिळतील.

सुशांतच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा पर्वणी आहे. त्यांना पडद्यावरचा सुशांतचा वावर हसवेल, प्रसंगी रडवेलही. मस्तमौला मैनीच्या भूमिकेत सुशातंकडे बघत बसावसं वाटतं. हा सुशांतच्या करिअरचा सर्वोत्तम काळ होता. तरी त्यानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं हे सतत हा सिनेमा बघतांना जाणवतं. त्याची कॉमिक टायमिंग उत्तम आहे. संजनं संघवीनेही त्याला उत्तम साथ दिलीये. तिचा हा पहिलाच सिनेमा असला तरी पडद्यावर ती आत्मविश्वासानं वावरली आहे. सुशांत आणि संजनाची केमिस्ट्री सिनेमात उत्तम वठलीये.या दोघांनीच फटकेबाजी करत सिनेमा आपल्या खांद्यावर उचलला आहे. आयुष्यात अशक्य गोष्टी शक्य करता येऊ शकतात यासाठी रजनीकांतचा वापरलेला मेटाफर असो किंवा पंजाबी, बंगाली, तमिळ, भोजपुरी या सगळ्याच भाषांचा विविध टप्प्यावर केलेला वापर सिनेमात इंटरेस्ट टिकवून ठेवतो.

प्रसिध्द नॉवेलिस्ट जॉन ग्रीन ‘दा फॉल्ट इन ऑवर स्टार्स’ या पुस्तकावर 2014 साली हॉलिवूडमध्ये सिनेमा बनला होता. त्या सिनेमाचा हा सिनेमा ऑफिशियल रिमेक जरी असला तरी हॉलिवूडपटाची सर या सिनेमाला नाही. दिग्दर्शक म्हणून मुकेश छाबरांचा हा पहिलाच चित्रपट. बरं चित्रपट रिमेक असल्यामुळे अख्खा पाया आधीच रचला होता. त्यांना त्यावर फक्त कोरीव काम करायचं होतं, पण इथेच ते कमी पडलेत. हा सिनेमा अजून उत्तम होऊ शकला असता, थेट काळजाला भिडला असता मात्र इथेच छाब्रा कमी पडलेत. सिनेमात पुढे काय घडणार याचा अंदाज आपल्याला येतो, कारण या थीमवरील अनेक क्लासिक चित्रपट आपण यापूर्वी बघितलेत.

सिनेमात काही प्रसंग असे आहेत ते अजून खुलवता आले असते. सुशांतच्या मित्राच्या भूमिकेत दिसलेला साहिल वेदलाही चित्रपटात योग्य वाव मिळालेला नाही. आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्यावर हसत हसत मात कशी करावी हे सांगण्याचा मुकेश छाब्रा यांनी प्रयत्न केलाय. काही गाळलेल्या जागा त्यांनी अजून भरल्या असत्या तर नक्कीच हा सिनेमा अजून उत्तम झाला असता. सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये सुशांतने त्याला कायम लक्षात ठेवण्याचा संदेश दिलाय.

स्वस्तिका मुखर्जी, साश्वता चाटर्जी यांनी किझीच्या आई-वडिलांच्या भूमिकेत उत्तम काम केलंय. अभिमन्य वीर सिंगच्या दोन मिनिटांच्या भूमिकेत सैफअली खान लक्षात राहतो. ‘दिल बेचारा’, ‘मेरा नाम किजी’, ‘तुम ना हुए मेरे तो क्या’ और ‘खुल कर जीने का तरीका’ ही रहेमानने संगीतबध्द केलेली गाणी चांगली जुळून आलीयेत. आता गाण्य़ांना अस्सल रहेमानचा टच नसला तरी ऐकायला बरी वाटतात. सिनेमाचं टायटल सॉंग मात्र खुप लवकर आणि चुकीच्या ठिकाणी वापरलंय. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. सत्यजित पांडेचा कॅमेरा उत्तम फिरलाये. जमशेदपूर असो का पॅरीस त्यांचा कॅमेरा उत्तम फिरलाये.

एकूणच काय तर हा चित्रपट एका हॉलिवूड शोकांतिकेची सामान्य आवृत्ती आहे, पण सुशांतचा शेवटचा सदाबहार अभिनय बघायची इच्छा असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी ट्रीट आहे. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.