भर दिवसा सेवानिवृत्त शिक्षकाची हत्या, गुन्हा करून आरोपी स्वत: पोलीस स्टशनमध्ये हजर

धक्कादायक बाब म्हणजे खुनानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाणे इथं हजर झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

भर दिवसा सेवानिवृत्त शिक्षकाची हत्या, गुन्हा करून आरोपी स्वत: पोलीस स्टशनमध्ये हजर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील आगळगाव ते उम्बर्गे या रोडवर कळंबवाडी याठिकाणी रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबक उमाप यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खुनानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाणे इथं हजर झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. (two Accused murder retired teacher in solapur)

त्रंबक उमप असं हत्या झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. त्रंबक हे आपल्या शेतातील उडीद पिकाची पट्टी घेण्यासाठी बार्शी बाजार समिती या ठिकाणी जात होते. यावेळीच आगळगाव ते उम्बर्गे या रस्त्यावर संशयित आरोपी बिभीषण विश्वनाथ उमप आणि त्याचे वडील विश्वनाथ बाबू उमप या दोघा बाप-लेकांनी त्यांची गाडी अडवून जोरदार भांडण केलं.

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

या दोघांचं जोराचं भांडण चालू असल्याचं सुमंत उमाप यांनी फिर्यादीस फोन वरून सांगितले असता ते तात्काळ दुसरी दुचाकी घेऊन गुन्हा झालेल्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांना त्यांचे वडील त्रंबक उमाप हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले तसेच वरून दोघेही आरोपी लाथाबुक्क्यांनी दगडाने त्यांना मारत असल्याचे फिर्यादी गणेश उमप यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हंटल आहे.

सदर घटनेनंतर आरोपी बिभीषण उमप आणि विश्वनाथ उमप यांच्या विरोधात बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्रंबक यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

रात गयी, बात गयी, खडसेंबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची कमेंट

(two Accused murder retired teacher in solapur)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI