AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच हजारांसाठी अडीच वर्षीय चिमुकलीची हत्या

अडीच वर्षाच्या चिमुकलीची केवळ पाच हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पाच हजारांसाठी अडीच वर्षीय चिमुकलीची हत्या
| Updated on: Jun 07, 2019 | 9:01 AM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अडीच वर्षाच्या चिमुकलीची केवळ पाच हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तीन दिवसांपूर्वी 2 जूनला टप्पल येथे या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. ट्विंकल शर्मा असे या अडीच वर्षाच्या मुलीचे नाव आहे.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी टप्पल येथील रहिवासी जाहीद (वय 27 वर्ष) आणि असलम (वय 42 वर्ष) या दोघांना अटक केली आहे. या दोघांना अटक केल्यानंतर ट्विंकलच्या मृत्यूचं जे कारण समोर आलं ते खरंच धक्कादायक होतं. आरोपी जाहीद याचा ट्विंकलच्या वडिलांशी पैशांवरुन वाद सुरु होता. ट्विंकलच्या वडिलांनी जाहीदकडून 40 हजार रुपये उधार घेतले होते. त्यापैकी 35 हजार त्यांनी जाहिदला पर केले. मात्र, शिल्लक पाच हजार रुपये ते परत देत नव्हते. यावरुन जाहीद आणि ट्विंकलच्या वडिलांचा वाद झाला. यानंतर जाहीदने ट्विंकलच्या वडिलांना धमकीही दिली. मात्र, केवळ पाच हजार रुपयांसाठी जाहीद त्यांच्या चिमुकलीला नेहमीसाठी त्यांच्यापासून हिरावून घेईल, असा विचारही ट्विंकलच्या वडिलांनी कधी केला नसेल.

31 मे रोजी ट्विंकल बेपत्ता झाली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी ट्विंकलचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2 जूनला कचऱ्याच्या ठिगारात ट्विंकलचा मृतदेह आढळून आला. जेव्हा तिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला तेव्हा तिचे हात कापलेले होते. अत्यंत निर्घृण आणि निर्दयीपणे ट्विंकलची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी जाहीद आणि असलमला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला. त्यांनीच ट्विंकलचं अपहरण करुन तिची हत्या केल्याचं सांगितलं. या दोघांवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर या घटनेविषयी काही अफवा पसरवल्या जात होत्या. त्यावर स्वत: अलीगडचे पोलीस निरीक्षक आकाश कुलहरी यांनी स्पष्टीकरण दिलं. ट्विंकलसोबत बलात्कार झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तिच्यासोबत बलात्कार झाला नसल्याचं समोर आलं. ट्विंकलवर अॅसिड टाकले तसेच तिचे डोळे काढल्याचंही सोशल मीडियावर सांगितलं जात होतं. मात्र, या सर्व अफवा असल्याचं आकाश कुलहरी यांनी सांगितलं.

ही बातमी पुढे येताच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. सोशल मीडियावर #JusticeforTwinkleSharma हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विंकलला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तसेच अनेक दिग्गज लोकांनी या प्रकरणी ट्वीट करत निषेध नोंदवला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...