रखडलेल्या परीक्षा 10 नोव्हेंबरपर्यंत घेणार, सामंतांची घोषणा, विद्यापीठ कायद्यात सुधारणांसाठी समिती

ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर परिस्थिती, तांत्रिक कारण अथवा कोव्हिडमुळे झाल्या नाहीत, त्यांच्या परीक्षा 10 नोव्हेंबर पर्यंत घेतल्या जातील, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. (Uday Samant said remaining university exam conduct before 10 November )

रखडलेल्या परीक्षा 10 नोव्हेंबरपर्यंत घेणार, सामंतांची घोषणा, विद्यापीठ कायद्यात सुधारणांसाठी समिती
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 4:39 PM

मुंबई : ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर परिस्थिती, तांत्रिक कारण अथवा कोव्हिडमुळे झाल्या नाहीत, त्यांच्या परीक्षा 10 नोव्हेंबर पर्यंत घेतल्या जातील, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लागू  केलेल्या विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ठाकरे सरकारनं कार्यवाही सुरु केल्याची माहिती सामंतानी दिली. (Uday Samant said remaining university exam conduct before 10 November )

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा आदेश दिल्यानंतर राज्यात परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अतिवृष्टी, पूर, कोरोना इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देत्या आल्या नव्हत्या. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर परिस्थिती, तांत्रिक कारण अथवा कोव्हिडमुळे झाल्या नाहीत त्या परीक्षा १० नोव्हेंबर पर्यंत घेतल्या जातील, असे सामंतांनी सांगितले. यूजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस सरकारच्या काळातील लागू केलेल्या विद्यापीठ कायद्यातमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सर्व कुलगुरूंसोबत चर्चा केली असून परीक्षांच्या आयोजनादरम्यान विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला आहे. मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षेदरम्यान जो सायबर हल्ला झाला त्याबाबत तक्रार सायबर सेलकडे केली आहे.

अमरावतीमध्ये जो गदारोळ झाला त्या ठिकाणी कंपनी ने सहकार्य न केल्याने गोंधळ उडाला त्या बाबत सत्यशोधन समिती नेमली आहे. विद्यापीठ कायद्याप्रमाणे अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. सत्यशोधक समिती मध्ये ४ सदस्य असतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

विद्यार्थ्यांना जो मनस्ताप झाला आहे त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. अमरावती विद्यापीठातील प्रकरणाबाबत राज्यपालांना विनंती करणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती उदय सांमत यांनी दिली.

सीईटीबाबत परीक्षेबाबत राज्य सरकारने दोन निर्णय घेतले आहेत. पूर परिस्थितीमुळे परीक्षा न देता आलेल्या टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना मुदत वाढवून आणखी २ दिवस नोंदणी साठी देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यापीठात जवळपास ७५ ते ८० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा दिल्या आहेत, असंही सामंत म्हणाले.

संबंधित बातम्या :

लालपरीतील प्रवासी मास्क लावतात की नाही, उदय सामंतांनी केली पाहणी

Maharashtra Rain | भातशेतीचं नुकसान, उदय सामंतांचे पंचनामे करण्याचे आदेश

(Uday Samant said remaining university exam conduct before 10 November )

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.