लालपरीतील प्रवासी मास्क लावतात की नाही, उदय सामंतांनी केली पाहणी

लालपरीतून प्रवास करणारे प्रवासी मास्क लावतायत की नाही याची पाहणी चक्क मंत्र्यांनी केली. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये बसमध्ये चढून याची पडताळणी केली. (Uday Samant checking of ST bus travellers wear mask  in Ratnagiri )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:39 PM, 20 Oct 2020
uday samant st

रत्नागिरी: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज लालपरी म्हणजेच एसटीतून प्रवास करणारे प्रवासी मास्क लावतात की नाही याची पडताळणी केली. एसटीमधील प्रवासी मास्क वापरत नाहीत, अशा तक्रारी उदय सामंत यांच्याकडे आल्या होत्या. (Uday Samant checking of ST bus travellers wear mask  in Ratnagiri )

उदय सामंत यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा दौरा सुरु होता. यावेळी मावळंगे गावात गाड्यांचा ताफा थांबवून उदय सामंत यांनी पाहणी केली. सामंत यांनी बस चालक आणि वाहकांना सुद्धा मास्क लावण्याच्या सूचना केल्या.

बस मधले प्रवासी मास्क वापरत नाही, अशी तक्रार आली होती. त्यामुळे ही पाहणी केल्याचं उदय सामंत यांनी सष्ट केलं. मास्कचा वापर केला तर कोरोना विरोधातील लढाई जिंकली जाईल, त्यामुळे मास्क वापरण्याचे आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे.

ग्रामीण भागातील लोकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिला जातोय. एसटीमध्ये पाहणी केला असता सर्व प्रवाशांनी मास्क घातले होते, असे उदय सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, माझी कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेपर्यंत पोहोचले आहेत. निसर्ग चक्रीवादळामध्ये जिल्ह्याला मदत मिळाली आहे. कॅगच्या अहवालात जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढलेले आहेत. कोणत्याही व्यक्तीला किंवा ती योजना आणणाऱ्या संस्थापकाला अडचणीत आणण्यासाठी चौकशी लावली नसल्याचे उदय सामंतांनी म्हटले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रात पक्षाची भूमिका दिसते. अमित शाह यांनी बोलल्यानंतर आम्ही काही बोलायची गरज नाही, असेही सामंत म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही, उदय सामंतांचा टोला

राज ठाकरेंचा उदय सामंतांना फोन, शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरू करु, सामंतांकडून आश्वासन

(Uday Samant checking of ST bus travellers wear mask  in Ratnagiri )