आधार कार्ड म्हणजे भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा नव्हे : UIDAI

आधार कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करण्याचं प्रमाण नाही, असं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) स्पष्ट केलं आहे.

आधार कार्ड म्हणजे भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा नव्हे : UIDAI
आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची आहे? या कागदपत्रांद्वारे करा अपडेट
Follow us
| Updated on: Feb 19, 2020 | 4:28 PM

हैदराबाद : आधार कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करण्याचं प्रमाण नाही, असं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) स्पष्ट केलं आहे. हैदराबाद येथे 127 जणांनी बनवाट कागदपत्रांमार्फत आधारकार्ड प्राप्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर प्राधिकरणाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे (UIDAI issues notices to 127 people). दरम्यान, प्राधिकरणाने बनावट कागदपत्रांच्यामार्फत आधारकार्ड प्राप्त करणाऱ्या सर्व 127 जणांना नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण?

हैदराबादमध्ये 127 जणांनी बनावट कागदपत्रे दाखवत आधार कार्ड बनवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी ही माहिती प्राधिकरणाला दिली. प्राधिकरणाने या माहितीच्या आधारावर तातडीने कारवाई करत पोलिसांमार्फत नोटीस बजावली (UIDAI issues notices to 127 people). या नोटीस अंतर्गत खोट्या कागदपत्रांमार्फत आधार कार्ड बनवणाऱ्या 127 जणांना 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या वेळेपर्यंत त्यांनी यावर आपली कागदपत्रे खरी असल्याचे सिद्ध करायची आहेत. अन्यथा त्यांचे आधारकार्ड रद्द होणार आहेत.

“आधार कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करण्याचं प्रमाण नाही. नियमानुसार जी व्यक्ती भारतात 182 दिवसांपेक्षा जास्त दिवस म्हणजे सहा महिन्यांपेक्षा दिवस वास्तव्यास असेल त्या व्यक्तीला आधार कार्ड दिलं जातं”, असं स्पष्टीकरण प्राधिकारणाने दिलं. दरम्यान, भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनसीआर, एनपीआर यांच्यावरुन वाद-विवाद सुरु असताना आधार कार्डबाबत अशाप्रकारची माहिती समोर आल्यानंतर देशातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

ओवेसींची केंद्र सरकारवर टीका

प्राधिकरणाकडून 127 जणांना नोटीस बजावण्यात आल्याच्या गोष्टीचा धागा पकडत एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “आधार कार्डवरुन नागरिकत्व सिद्ध होत नाही, असं आधार कार्डचं सेक्शन नऊ सांगतं. मग प्राधिकरणाला कुणाच्याही नागरिकत्वाचा पुरावा मागण्याचा अधिकार आहे का? हे संविधानांच्या नियमांबाहेर आहे”, अशी टीका ओवेसींनी केली.

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.