गर्लफ्रेंडला श्रेय देणारा पठ्ठ्या, UPSC टॉपर कनिष्क कटारियाची कहाणी

नवी दिल्ली : प्रत्येकाच्या यशामागे कुणाचे ना कुणाचे काहीतरी का होईना योगदान नक्कीच असते. याबाबत मिळालेल्या यशाचे श्रेय संबंधित व्यक्तींनी आई, वडील, मित्र आणि नातेवाईकांना दिलेले आपण अनेकदा ऐकतो. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत पहिला क्रमांक पटकावलेल्या कनिष्क कटारियाची (Kanishak Kataria) कहाणी काहीशी वेगळी आहे. त्याने आपल्या यशाच्या श्रेयात आपल्या प्रेयसीलाही भागीदार बनवले आहे. […]

गर्लफ्रेंडला श्रेय देणारा पठ्ठ्या, UPSC टॉपर कनिष्क कटारियाची कहाणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नवी दिल्ली : प्रत्येकाच्या यशामागे कुणाचे ना कुणाचे काहीतरी का होईना योगदान नक्कीच असते. याबाबत मिळालेल्या यशाचे श्रेय संबंधित व्यक्तींनी आई, वडील, मित्र आणि नातेवाईकांना दिलेले आपण अनेकदा ऐकतो. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत पहिला क्रमांक पटकावलेल्या कनिष्क कटारियाची (Kanishak Kataria) कहाणी काहीशी वेगळी आहे. त्याने आपल्या यशाच्या श्रेयात आपल्या प्रेयसीलाही भागीदार बनवले आहे.

यूपीएससी परीक्षेतील आपल्या यशाबद्दल बोलताना कनिष्क कटारिया म्हणाला, ‘माझ्यासाठी हा क्षण अत्यंत अविश्वसनीय आहे. मी यूपीएससी परिक्षेत पहिला क्रमांक मिळवू शकेल याची मला आशा नव्हती. माझ्या या यशासाठी मी माझे आई-वडील, बहिण आणि प्रेयसीला धन्यवाद देतो. त्यांनी मला नैतिक ताकद दिली. आता लोक माझ्याकडून एक चांगला अधिकारी बनण्याची अपेक्षा ठेवतील आणि माझाही उद्देश चांगला अधिकारी होण्याचेच आहे.’

काही वर्ष नोकरी केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा निर्णय

कनिष्क कटारियाने पर्यायी विषयांमध्ये गणित विषय घेऊन हे यश मिळवले. त्याने आयआयटी मुंबई येथून कॉम्प्यूटर सायन्समध्ये बीटेकचे (BTech) शिक्षण घेतले आहे. यानंतर त्याने काही वर्ष नोकरीही केली. याच काळात त्याचा स्पर्धा परीक्षांकडे कल वाढला. घरात वडिलांकडूनही त्याला मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर त्याने काही काळ दिल्लीत कोचिंग घेत अभ्यासक्रमाची माहिती करुन घेतली. उर्वरित काळ त्यांने घरीच अभ्यास केला.

या परीक्षेत आयएएस, आयपीएस आणि आयएफएस इत्यादी पदांसाठी एकूण 759 लोकांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. यात 577 पुरुष आणि 182 महिला आहेत. पहिल्या स्थानावर कनिष्क कटारिया, तर दुसऱ्या स्थानावर अक्षत जैन आहे. आयआरएसचे प्रशिक्षण घेत असलेल्या जुनैद अहमदने तिसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच 5 व्या स्थानावर सृष्टी जयंत देशमुख असून ती महिलांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

लोकसेवा आयोगाची सुरुवातीची परीक्षा जून 2018 मध्ये झाली होती. या परीक्षेसाठी एकूण 10 लाख 65 हजार 552 परीक्षार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी 4 लाख 93 हजार 972 जणांनी परीक्षेत सहभाग घेतला. सप्टेंबर-ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या लेखी (मुख्य) परीक्षेत 10 हजार 468 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये झालेल्या वैयक्तिक मुलाखतींमध्ये एकूण 1 हजार 994 परीक्षार्थींना यश आले. यूपीएससीच्या पहिल्या 25 जणांमध्ये 15 पुरुष आणि 10 महिला आहेत. या परिक्षेत दुसऱ्या स्थानी असलेल्या अक्षत जैनने आयआयटी गुवाहाटी येथून इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. त्याने आपण समाजसेवेसाठी लोकसेवा परीक्षा दिल्याचे सांगितले. जयपूरच्या अक्षतचे वडीलही आयपीएस आणि आई भारतीय महसूल सेवेत अधिकारी आहे.

व्हिडीओ पाहा: संबंधित बातम्या:

UPSC Result : पहिल्याच प्रयत्नात देशात पाचवा क्रमांक मिळवणारी सृष्टी देशमुख कोण आहे?

औरंगाबादमध्ये वॉटर ऑपरेटरच्या मुलाचं यूपीएससीत घवघवीत यश, देशात 155 वी रँक

लढाई-पढाई आणि निवडही एकत्रच, पुण्यातल्या रुममेटची यूपीएससीत बाजी

यूपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा, सृष्टी देशमुखचा देशात पाचवा क्रमांक

UPSC Result : पुण्यातल्या पोरांचा दिल्लीत झेंडा, यूपीएससीत घवघवीत यश

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.