UPSC Result : पहिल्याच प्रयत्नात देशात पाचवा क्रमांक मिळवणारी सृष्टी देशमुख कोण आहे?

भोपाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झालाय. कनिष्क कटारिया याने देशातून अव्वल येण्याचा मान मिळवलाय. अक्षत जैन आणि जुनैद अहमद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सृष्टी देशमुख ही पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे. शिवाय महिला उमेदवारांमध्येही ती पहिली आली आहे. कोण आहे सृष्टी देशमुख? …

who is srushti deshmukh, UPSC Result : पहिल्याच प्रयत्नात देशात पाचवा क्रमांक मिळवणारी सृष्टी देशमुख कोण आहे?

भोपाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झालाय. कनिष्क कटारिया याने देशातून अव्वल येण्याचा मान मिळवलाय. अक्षत जैन आणि जुनैद अहमद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सृष्टी देशमुख ही पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे. शिवाय महिला उमेदवारांमध्येही ती पहिली आली आहे.

कोण आहे सृष्टी देशमुख?

सृष्टी देशमुख ही महाराष्ट्रातील असल्याचाच सर्वांचा समज होता. पण ती मध्य प्रदेशातील आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय सृष्टीने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलंय. ती केमिकल इंजीनिअर असून एक वर्षापूर्वीच तिने यूपीएससीची तयारी सुरु केली होती. सृष्टीचे वडीलही इंजीनिअर असून तिची आई शिक्षिका आहे. लहानपणापासूनच अभ्यासाचं वातावरण लाभलेल्या सृष्टीने पहिल्याच प्रयत्नात हे नेत्रदिपक यश मिळवलंय.

सृष्टी तिच्या यशाचा मंत्रही सांगते. तिने अनेक क्लासेसचं मार्गदर्शन घेतलं. पण स्वतः अभ्यास करण्यावर भर दिला. अभ्यासामुळे तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट बंद केले होते. पण अभ्यासासाठी तिने इंटरनेटची मदत मात्र घेतली. चांगला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला किती तास अभ्यास केला हे महत्त्वाचं नाही, तर मन लावून अभ्यास करण्याला महत्त्व असल्याचं ती सांगते.

लहानपणापासूनच आयएएस होण्याचं सृष्टीचं स्वप्न होतं. त्यादृष्टीने तिने प्रयत्न सुरु केले. ती योगा आणि मेडिटेशनही करते, ज्यामुळे अभ्यासात आणखी मन लागतं. आई-वडिलांना ती या यशाचं श्रेय देते.

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी

तृप्ती धोडमिसे – 16 वी

वैभव गोंदणे – 25 वा

मनिषा आव्हाळे – 33 वी

हेमंत पाटील – 39 वा

टॉपर विद्यार्थ्यांची यादी

  1. कनिष्क कटारिया
  2. अक्षत जैन
  3. जुनैद अहमद
  4. श्रवण कुमात
  5. सृष्टी जयंत देशमुख
  6. शुभम गुप्ता
  7. कर्नाटी वरूणरेड्डी
  8. वैशाली सिंह
  9. गुंजन द्विवेदी
  10. तन्मय वशिष्ठ शर्मा

यूपीएससीकडून एकूण 759 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. देशात आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी निवडणारी ही सर्वोच्च परीक्षा आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यावर्षीही बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या निकालातही महाराष्ट्रातील टॉपर विद्यार्थ्यांचा समावेश होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *