डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जानेवारीपर्यंत कार्यभार, अमेरिका-चीन यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध अधिक ताणण्याची शक्यता आहे. (US-China relation will be worse till January in the tenure of Donald Trump)

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जानेवारीपर्यंत कार्यभार, अमेरिका-चीन यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता

वॉशिंग्टन: जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. जो बायडन यांना 279 तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल वोट मिळाले आहेत. मात्र, अमेरिकेतील मतमोजणी 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. जो बायडन यांचा शपथविधी 20 जानेवारीला होणार आहे. तोपर्यंत अध्यक्षपदाचा कार्यभार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच राहील. या कालावधीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध अधिक ताणण्याची शक्यता आहे. (US-China relation will be worse till January in the tenure of Donald Trump)

शांघायधील फुडन विद्यापीठाच्या अमेरिकन स्टडीज अभ्यास केंद्राचे प्रमुख वू झिनबो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील अमेरिकेचे प्रशासन आणि चीन यांच्यातील तणाव वाढू शकतो, असं म्हटलंय. चीनमधील शिनजियांग मधील अल्पसंख्याक उइगर मुस्लीमांच्या शोषणाला किंवा अत्याचाराला अमेरिकेकडून ‘नरसंहार’ म्हटले जाऊ शकते. अमेरिकेत चिनी कंपन्यांवर अधिकाधिक निर्बंध लावणे आणि तैवानला समर्थन देणे हा अमेरिकेचा अजेंडा राहू शकतो.

वू झिनबो यांनी “डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणू संसर्गासाठी चीनला दोषी ठरवले आहे. यामुळेच त्यांचे निवडणुकीत नुकसान झाले असावे”, असं मत वू झिनबो यांनी व्यक्त केलं आहे. “अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांच्यासारख्या नेत्यांना अमेरिका-चीन संबंधात तणाव वाढवण्याची संधी आहे”, असं वू झिनबो यांनी म्हटलं आहे.

चीनच्या तज्ज्ञांनी निवडणुकीपूर्वी अमेरिकेच्या चीन विरुद्धच्या भूमिकेमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडत असल्याचे म्हटले होते. जर डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव झाला तर दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडतील, अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती.

दक्षिण चीन आणि तैवानचा मुद्दा

दोन्ही देशांमधील तणाव वाढण्यास दक्षिण चीन समुद्र आणि तैवानचा मुद्दा कारणीभूत ठरु शकतो. कार्टर सेंटर चीनचे निर्देशक लियू यावी यांनी ऑगस्ट महिन्यातच अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधातील तणाव वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला होता. त्यांनी ” 3 नोव्हेंबर ते 20 जानेवारीपर्यंत चीन आणि अमेरिकेतील सबंध सर्वाधिक ताणलेले असतील”, अशी भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी दक्षिण चीन समुद्र आणि तैवानच्या मुद्द्यावर संयम राखला पाहिजे, असं लियू यावी यांनी आवाहन केले होते.शी यिनहोंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील कायदेशीर लढाईवर आहे. दोन्ही देशातील तणाव वाढण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केलं आहे. दोन्ही देशांच्या सेना प्रमुखांनी ऑगस्टमध्ये टेलिफोनद्वारे संभाषण केले होते.

संबंधित बातम्या :

US Election | निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांना जेरुसलेममध्ये नवी नोकरी? नगरपालिकेकडून ‘जॉब ऑफर’

Joe Biden | जो बायडन यांच्या कार्यकाळात 5 लाख भारतीयांना मिळू शकते अमेरिकेचे नागरिकत्व

(US-China relation will be worse till January in the tenure of Donald Trump)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI